Home /News /news /

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर RBI ने लादले निर्बंध, ग्राहकांना नाही काढता येणार 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर RBI ने लादले निर्बंध, ग्राहकांना नाही काढता येणार 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर बँकिंग नियमन कायदा (सहकारी संस्थांना लागू), 1949 अंतर्गत हे निर्बंध 6 डिसेंबर 2021 रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू झाले आहेत.

    मुंबई, 07 डिसेंबर: तुम्ही जर अहमदनगर स्थित नगर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेडचे (Nagar Urban Co-operative Bank Ltd) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आरबीआयने या बँकेवर अनेक निर्बंध (RBI imposes restrictions on Nagar Urban Co-operative Bank Ltd, Ahmednagar) लादले आहेत, ज्याचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे. आरबीआयच्या निर्बंधांनंतर ग्राहकांच्या पैसे काढण्याच्या क्षमतेवर मर्यादा आली आहे. कारण आता या बँकेचे ग्राहक त्यांच्याच खात्यातून 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. बँकेची खराब आर्थिक स्थिती पाहता अशाप्रकारे निर्बंध लादण्याचा निर्णय देशाची केंद्रीय बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. 6 महिन्यांसाठी लागू असणार निर्बंध बँकिंग नियमन कायदा (सहकारी संस्थांना लागू), 1949 अंतर्गत हे निर्बंध 6 डिसेंबर 2021 रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू झाले आहेत. या निर्बंधांबाबत पुनरावलोकन केले जाईल. हे वाचा-केंद्र सरकारडून 22.55 कोटीं नागरिकांच्या खात्या पैसे ट्रान्सफर; तुम्हीही चेक करा मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की बँक त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देणार नाही किंवा कोणतीही आगाऊ रक्कम देणार नाही, याशिवाय बँकेला कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. बँकेला कोणतीही गुंतवणूक करणे, कोणत्याही प्रकारचे दायित्व घेणे, पेमेंट करणे आणि मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करणे देखील प्रतिबंधित केले जाईल. हे वाचा-शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशी माहिती दिली आहे की ग्राहकांना त्यांच्या खात्यातून 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही आहे. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशाची प्रत देखील बँक परिसरात लावण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक ही प्रत वाचू शकतात. दरम्यान आरबीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की निर्बंध लादले गेले आहेत म्हणजे या बँकेचा परवाना रद्द झालेला नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rbi, Rbi latest news

    पुढील बातम्या