News18 Lokmat

'सरकारने एकदाच काय तो संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात घ्यावा'

उर्जित पटेल राजीनामा देणार ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. सरकारनं एकदाचा कंट्रोल आपल्या हातात घ्यावा असंही उद्धव ठाकरे म्हटलंय.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 09:10 PM IST

'सरकारने एकदाच काय तो संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात घ्यावा'

मुंबई, 10 डिंसेंबर - रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ''रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांनी राजीनामा दिला आहे. दोघांनी राजीनाम्याचं कराण वैयक्तिक दिलंय. गेले काही दिवसांपासून याची चर्चा होतीच. माणसं नेमणं आणि काढणं यात सरकारने आसा वेळ घालवू नये. सरकारने एकदाच काय तो संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात घ्यावा. एकूण काय तो प्रकार देशासमोर उघड आहे त्यामुळे ही नाटकं थांबली तरी चालतील'', असा उद्धव ठाकरे म्हणाले.

20 ऑगस्ट 2016 रोजी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कारभार स्विकारला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर आरबीआय आणि सरकारमध्ये खटके उडाले होते. मध्यंतरी रिझर्व बँक आणि सरकार यांच्यातला तणाव देखील वाढला होता. सरकार RBI ला इथून पुढेही सल्ले देत राहील, अशी स्पष्टोक्ती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला होता. त्यात उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील महिन्यातच रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देण्याची शक्यता होती. पण अखेर आज त्यांनी आज राजीनामा दिला.

मागील एका तासात देशात दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यातील एका घटना ही केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठा धक्का देणारी होती. ती म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा. आणि त्यानंतर काही क्षणांतच केंद्र सरकारच्या एका मोठ्या प्रयत्नाला यश आल्याची बातमी येवून धडकली. कर्जबुडव्या विजय माल्ल्याचे भारताला प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याची.

उर्जित पटेल हे रिझर्व बँकेचे २४ वे गव्हर्नर जागतिक स्तरावर नावाजलेले अर्थतज्ज्ञ मानले जातात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF)सारख्या संस्थांसाठीही त्यांनी काम केलं आहे. खरं तर मोदी सरकारनंच उर्जित पटेल यांची नेमणूक केली होती. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या जागेवर पटेल यांची नियुक्ती झाली होती. पण राजन यांचेही मोदी सरकारबरोबर अनेक बाबतीत मतभेद होते आणि ते त्यांनी नंतर जाहीरपणे सांगितले देखील. निश्चलनीकरण आणि नोटाबंदीवरून हे मतभेद होते.


Loading...

 VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...