मंत्री दिवाकर रावते गारपीटग्रस्त शेतकऱ्यावरच भडकले !

मंत्री दिवाकर रावते गारपीटग्रस्त शेतकऱ्यावरच भडकले !

तापट स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या मंत्री दिवाकर रावतेंनी आज पुन्हा वाशिमच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर आपला राग काढलाय. विदर्भ आणि मराठवाडाच्या काही भागातील नुकसानग्रस्त भागाला आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट दिली आहे.

  • Share this:

16 फेब्रुवारी, वाशिम : तापट स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या मंत्री दिवाकर रावतेंनी आज पुन्हा वाशिमच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर आपला राग काढलाय. विदर्भ आणि मराठवाडाच्या काही भागातील नुकसानग्रस्त भागाला आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट दिली आहे. आज अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतलीय. या शेतकऱ्याचं एवढंच चुकलं की त्यांनी मंत्री साहेबांना "नुकसान १००% झालं, मात्र मदत काहीच मिळाली नाही" एवढा प्रश्न विचारला. त्यावर रावते तक्रारकर्त्या शेतकऱ्यावरच भडकले.

रावते म्हणाले, ''गारपीटग्रस्ताना मदत जाहीर झालीय ना, मग ती लगेच आजच्या आज मिळण्याची कशी काय अपेक्षा धरता ? मी आलोय ना तुमच्यासाठी इथे, मदतही मिळेल. उगीच तक्रार कशाला करता ? ''

दिवाकर रावतेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांमधूनही रावतेंच्या या दादागिरीविरोधात तीव्र नापसंती व्यक्त होतेय.

First published: February 16, 2018, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading