नवी दिल्ली, 20 मे : दुधाला संपूर्ण अन्न मानलं जातं कारण त्यात जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात, म्हणूनच बहुतेक आरोग्य तज्ज्ञ चांगल्या आरोग्यासाठी दूध पिण्याची शिफारस करतात. दुधाचा वापर अनेक प्रकारे केला जातो, काही लोक दूध थेट पितात किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊन देखील या सुपरफूडचा (Raw Milk Side Effects) फायदा घेऊ शकतात. मात्र, दूध कसं प्यावं याबाबत अनेकांच्या मनात शंका असते.
दूध कच्चे प्यावे की उकळून थंड झालेले?
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, दूध पिताना अनेकांच्या मनात गोंधळ असतो किंवा अनेकांच्या डोक्यात याविषयी काही गैरसमज असतात. थेट कच्चे दूध पिण्याबद्दल बोललं जातं, तेव्हा सर्वाधिक चर्चा होते की दूध कच्चे प्यावे की उकळून? याबाबत नेमकं काय योग्य आहे, याविषयी आज जाणून घेऊया.
कच्चे दूध प्यायल्यास काय होतं?
सत्य हे आहे की, कच्चे दूध प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. अमेरिकेच्या आरोग्य संरक्षण संस्थेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते, कच्च्या दुधामध्ये एस्चेरिचिया कोला (ई. कोलाय) आणि लिस्टेरिया, साल्मोनेला इत्यादी अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात. अन्नातून विषबाधा होण्याचा प्रकार एखाद्याच्याबाबतीत कच्चे दूध प्यायल्यानंतर होऊ शकतो.
हे वाचा -
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची
कच्चे दूध पिण्याचे दुष्परिणाम -
कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. ज्यामुळे अतिसार, संधिवात आणि निर्जलीकरण सारख्या समस्या उद्भवतात.
हे वाचा -
Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला
कच्च्या दुधात घाण असू शकते -
कच्चे दूध पिणे यासाठी देखील हानिकारक आहे, कारण जनावराचे दूध काढताना त्यांची कास दूषित असू शकते, याशिवाय यासाठी स्वच्छ हात आणि स्वच्छ भांडी वापरली नाहीत तर दुधात घाण येऊ शकते. म्हणूनच हे आवश्यक आहे की आपण दूध उकळल्यानंतरच प्यावे जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.