जामीन मिळाल्यानंतर फरार झाला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी

जामीन मिळाल्यानंतर फरार झाला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी

जामीन मिळालेल्यानंतर फरार झालेल्या अंडवर्ल्ड डॉन रवी पुजारीविरोधात सध्या अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

सेनेगल, 10 जून : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक करण्यात आली पण, जामीन मिळाल्यानंतर रवी पुजारी फरार झाला आहे. सेनेगर कोर्टनं रवी पुजारीला जामीन मंजूर केला. त्यानंतर तो फरार झाला. सेनेगल कोर्टानं रवी पुजारीला पकडण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून रवी पुजारीला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला होता. पण, पासपोर्ट जप्त केल्यानंतर देखील रवी पुजारी फरार झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

गो तस्करीच्या आरोपावरून चौघांना मारहाण; लघवी प्यायला लावल्याचा आरोप

रवी पुजारीला अटक

पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशात रवी पुजारीचं वास्तव्य होतं. भारतीय यंत्रणांची त्याच्यावर नजर होती. त्यानंतर भारतीय यंत्रणांनी रवी पुजारीशी संबंधित माहिती सेनेगल पोलिसांना दिली. याच माहितीच्या आधारे रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला. सेनेगल कोर्टानं त्याला जामीन मंजूर केल्यानंतर रवी पुजारी आता पसार झाला आहे. रवी पुजारीला भारतात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू होते. रवी पुजारीविरोधात 78 गुन्हे दाखल आहेत. 49 गुन्ह्यांमध्ये रवी पुजारीचा थेट सहभाग आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या वतीनं त्याबाबत सर्व तपास सुरू आहे. सेनेगलमध्ये अटक केल्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला होता. याबाबत संबंधित यंत्रणांशी संपर्क आणि पत्र व्यवहार देखील सुरू होता. पण, जामीन मिळताच रवी पुजारी फरार झाला आहे.

कठुआच्या नराधमांनी कसा रचला प्लॅन?

गोळीबाराचे आरोप

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीनं मुंबईतील विलेपार्ले येथील गजाली हॉटेलवर फायरिंग केली होती. शिवाय, फायनान्सर अली मोरानीच्या बंगल्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात देखील रवी पुजारीवर गुन्हा दाखल आहे. याच केसशी संदर्भात रवी पुजारीचा जोडीदार ओबेद रेडिओवाला याला मागील महिन्यामध्ये भारतात आणण्यात आलं होतं.

SPECIAL REPORT : ...जेव्हा 'त्या' हातांनी राहुल गांधी यांना आशीर्वाद दिला

First published: June 10, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading