मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या सुरू, आमदारांचा गंभीर आरोप

गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या सुरू, आमदारांचा गंभीर आरोप

    पणजी, 16 ऑगस्ट : देशभरात कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. पण गोव्यात मात्र लॉकडाऊनचे नियम मोडत रेव्ह पार्ट्या सुरू असल्याचं समोर आलं आहे. गोव्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर उत्तर गोवा जिल्ह्यात गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. जिथे अमली पदार्थांचं सेवन केलं जात होतं. या प्रकरणात पोलिसांनी तीन परदेशीयांसह 23 जणांना अटक केली. रविवारी पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे. शनिवारी रात्री ही पार्टी अंजुना पोलीस स्टेशन परिसरातील वागातोर गावात व्हिलामध्ये सुरू होती. या पार्टीमधून नऊ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या पार्टीवर आमदार विनोद पालयेंकर यांनी गंभीर आरोप केला आहे. गोव्याच्या किनारपट्टी भागात राजरोसपणे रेव्ह पार्ट्या सुरू असतात. ही बाब मी वेळोवेळी सरकारच्या निदर्शनास आणली, पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. इतकंच नाही तर स्थानिक पोलिसांना लाच देऊन या रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केलं जात असल्याचा गंभीर आरोप पालयेंकर यांनी केला आहे. मुंबईत लॉकडाऊनमध्ये हुक्का पार्लरवर छापा, 28 तरुणींसह 97 जणांना अटक गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोन महिला रशियातल्या आहेत. या लोकांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेंन्स (NDPS) कायद्यांतर्गत बंदी घातलेल्या पदार्थ बाळगण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पवार कुटुंबात पुन्हा All Is Well, असा निवळला पार्थवरील वाद अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीलाही एनडीपीएस अधिनियमा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पार्टामध्ये असलेल्या इतर 19 जणांनाही पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अधिकतर सुट्टी साजरी करण्यासाठी आलेले पर्यटक असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Rev Party

    पुढील बातम्या