मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शिवसेनेनं काँग्रेससोबतची युती तोडावी, भाजपचा 2 दिवसांचा अल्टिमेटम

शिवसेनेनं काँग्रेससोबतची युती तोडावी, भाजपचा 2 दिवसांचा अल्टिमेटम

हे नाही झालं तर वेळ प्रसंगी राजीनामे देऊ पण सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हे नाही झालं तर वेळ प्रसंगी राजीनामे देऊ पण सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हे नाही झालं तर वेळ प्रसंगी राजीनामे देऊ पण सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

रत्नागिरी, 09 एप्रिल : मतदानाला अवघे दहा-बारा दिवस शिल्लक असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मात्र अजूनही सेना-भाजपामध्ये खटके उडतच आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन मेळावे घेतले असले तरी सिंधूदुर्गात भाजपच्या कार्यकर्त्यांचा असहकार कायम आहे. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेनं काँग्रेसबरोबर केलेली युती ती शिवसेना तोडत नाही, तोपर्यंत सेनेचा प्रचार करणार नाही असा पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

सेना-भाजपच्या गेल्या आठवड्यात झालेल्या मनोमिलन मेळाव्याचा हे दृश्य मनमोहक असलं तरी सिंधुदुर्गात युतीच्या विहिरीतलं पाणी अजूनही गढुळच आहे. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेनेला काँग्रेसबरोबर केलेली युती तोडण्यासाठी सेनेला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. हे नाही झालं तर वेळ प्रसंगी राजीनामे देऊ पण सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

'आज आम्ही शिवसेनेला सांगू इच्छितो, गेले दहा दिवस आम्ही वाट पाहत आहोत. यानंतर दोन दिवसांचा अल्टिमेटम आम्ही शिवसेनेला देत आहोत. जर सभापतीचा राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राजीनामा देतील आणि प्रचारात उतरणार नाहीत.' असा इशारा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असताना याठिकाणी दोडामार्ग तालुक्यात सेना आणि भाजपचे दोन-दोन सदस्य असताना स्थानिक नेत्यांनी आणि पालकमंत्री आणि खासदाराने वैयक्तिक स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीला डावलून शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीचे एक असा धरून सत्ता स्थापन केली आहे.

शिवसेनेचे आमदार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आल्यामुळे सेनेने केलेली काँग्रेससोबतची युती तोडण्यासाठी केसरकरांवर दबाव वाढतो आहे. यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही कसोटी लागणार आहे.

एकीकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी दिलेली दुय्यम वागणूक आणि आणि दुसरीकडे स्वतःच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे पक्ष वाढवण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आपला वापर फक्त निवडणुकीसाठीचं केला जातोय याची खंत आहे. त्यातूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेला हा घरचा आहेर आहे.

निवडणुकीच्या प्रचाराचा तिसरा टप्पा खरंतर सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची भाजपाची ही धूसफुस वाढत गेली तर सेनेच्या उमेदवाराचं मताधिक्य घटवू शकते आणि फायदा स्वाभिमान पक्षाला होईल. या भीतीने सेना-भाजपाचे नेते धास्तावले आहेत.

VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणा यांचा दिवस

First published:

Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Ratnagiri Sindhudurg S13p46