Home /News /news /

विनाकारण हिंडणाऱ्यांवर आणखी मोठी कारवाई, या जिल्ह्यात आता दुचारी फिरणार नाही

विनाकारण हिंडणाऱ्यांवर आणखी मोठी कारवाई, या जिल्ह्यात आता दुचारी फिरणार नाही

देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पण असं असलं तरी लोक विनाकारण घराच्या बाहेर पडतात.

    खेड, 26 मार्च : कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पण असं असलं तरी लोक विनाकारण घराच्या बाहेर पडतात. त्यांना जबर बसवा यासाठी पोलीस चांगलाच प्रसाद देतात पण तरीदेखील लोकांना राज्यातील परिस्थितीचं गांभीर्य नाही. याच पार्श्वभूमिवर राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात आता दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. खेडमधील भरणे नाका, भरणे, भडगाव, दस्तुरी , खेड शहर, भोस्ते परिसरात दुचाकी चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी असे आदेश दिले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. निदर्शनास आल्यास त्यांचे वाहन पुढील 14 दिवसांसाठी ताब्यात घेऊन , त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 4 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. हे वाचा - लवकरच मरणार कोरोनाव्हायरस, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी केली भविष्यवाणी मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती अशीही माहिती समोर येत आहे. ठाण्यात आणखी एक तर पनवेलमध्ये एक असे दोन नवे कोरोना रुग्ण आज सकाळपासून समोर आले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 124 वर पोहोचला आहे. अशा नागरिकांची चिंता वाढली आहे. हे वाचा - कोरोनाच्या भीतीने पित्याने केली आत्महत्या, कुटुंबासाठी लिहली सुसाइड नोट मुंबईत प्रभादेवी भागात महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे. याच भागात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे वाचा - धक्कादायक! 'लॉकडाऊन असताना घराबाहेर का गेला'? प्रश्न विचारताच भावाचाच केला खून 649 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात दरम्यान, भारतातील (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 649 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. आज देशभरात कोरोनाचे 43 नवे रुग्ण समोर आले. त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 43 रुग्ण बरे झाले आहेत. हे वाचा - तरुणीला हे शोभतं का? लॉकडाऊन तर मोडलंच वर पोलिसांना चावून काढलं रक्त, पाहा VIDEO
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या