पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 35 जणांचे तोडले लचके

पिसाळलेला कुत्रा अजुनही मोकट असल्याने शहरात भीतीचं वातावरण आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 11:20 PM IST

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 35 जणांचे तोडले लचके

रत्नागिरी, 10 डिसेंबर : दापोली शहरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घालत 35 जणांचे लचके तोडले. यामुळे दापोली शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.पिसाळलेला कुत्रा अजुनही मोकट असल्याने शहरात भीतीचं वातावरण आहे.

दापोली शहरात सोमवारी कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना एक पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला. समोर याईल त्याला चावा घेत तो शहरात मोकाट फिरत असल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कुत्रा चावलेल्या लोकांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. तर काही जखमींना इंजेक्शन देवून घरी पाठण्यात आलं आहे. पिसाळलेला कुत्रा अजुनही मोकट असल्याने शहरात भीतीचं वातावरण आहे. तर कुत्र्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी दापोलीतील नागरिकांनी नगरपंचायतकडे केली आहे.


दापोली उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शनचा तुतवडा

पिसाळलेल्या कुत्र्याने दापोलीत 35 जणांचे लचके तोडले. कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्यांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात रेबीज लसींचा तुटवडा असल्याने रुग्णालय व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Loading...


 VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 11:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...