नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

खेड तालुक्यातल्या सुकीवली चव्हाणवाडी इथल्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय.

  • Share this:

 21 जुलै : खेड तालुक्यातल्या सुकीवली चव्हाणवाडी इथल्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. तालुक्यातल्या सुकीवली चव्हाणवाडी इथं राहणारी पीडिता भरणे नाका इथली शिकत होती. काल सायंकाळी शाळा सुटल्यावर रिक्षा पकडून ती नेहमीप्रमाणे घरी जायला निघाली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालकांनं तिला सुकीवली चव्हाणवाडी स्टॉपवर सोडल्यावर ती घरी चालत जात असताना तिच्याच मागावर असलेल्या त्याच वाडीतील सुर्यकांत नवनाथ चव्हाण याने या मुलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या केली या प्रकरणी नराधम सुर्यकांत ला अटक करण्यात आलीय.

या हैवानाने तिच्यावर झडप घातली. तीने आरडाओरडा करू नये म्हणून तीचे तोंड दाबून तिला स्वतःच्या घरात ओढून नेले. या ठिकाणी तिच्यावर त्याने पाशवी बलात्कार करून गळा आवळून खून केला आणि तिला संडासच्या टाकीत फेकून दिले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये असा ठराव वकील संघटनेनं केला आहे.

आपण केलेले कृत्य बाहेर पडू नये म्हणून त्या नराधमाने तीचा गळा आवळून खून केला आणि तीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. थंड डोक्याने प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर सुर्यकांत हा पळून जाण्यासाठी खेड एसटी स्थानकावर आला.

सॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

काळोख पडायला आला तरी शाळेत गेलेले श्रृती घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ती कुठेच आढळून न आल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी खेड पोलीस स्थानकात येऊन श्रृती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी संशयित आरोपी म्हणून सुर्यकांत चव्हाण याच्यासह अन्य काही जणांची नावे दिली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून खेडचे पोलीस निरिक्षक अनिल गंभीर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे आणि खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.टी.नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली.

अंधश्रद्धेच्या नावाखाली १२० महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

पोलिसांनी तात्काळ सुकीवली चव्हाणवाडी येथे जावून सुर्यकांत याच्या घराची तपासणी केली असता त्यांना त्या ठिकाणी मुलीचा हेअरबँड तसंच भाताच्या कणगीत लपवून ठेवलेली तीची सँडल मिळाली. घरातील एका पत्र्याच्या ट्रंकची झडती घेतली असता त्या टँकमध्ये श्रुतीचे दप्तरही आढळून आले. या तीन्ही वस्तू श्रुतीच्या वडिलांनी ओळखल्याने या प्रकरणात सुर्यकांत याचाच हात असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले.

 महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?

या घृणास्पद प्रकरणातील आरोपी पळून जावू नये म्हणून खेड पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानक, भरणे नाका आणि खेड एसटी स्थानक येथे सापळा रचला. साध्या गणवेशातील पोलीस तपास करत असताना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास संशयित सुर्यकांत हा खेड एसटी स्थानकावर फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या ठिकाणी त्याची कसून चौकशी केली असता सुरवातीला त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याची पोलीस खाक्यात चौकशी सुरू करताच त्यांने आपला गुन्हा कबूल केला.

जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना २२ वर्षीय तरुणाला कार्डियाक्ट अरेस्ट, VIDEO व्हायरल

पोलिसांनी त्याला पहाटे सुकीवली चव्हाणवाडी येथे नेल्यावर त्याने तीचा मृतदेह ज्या शौचालयाच्या टाकीत टाकला होता ती टाकी दाखवली. पोलिसांनी पंचाच्या समक्ष टाकीचे झाकण उघडल्यानंतर टाकीत श्रुतीचा मृतदेह आढळून आला. टाकीतून मृतदेह बाहेर काढताच तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही आपले अश्रू आवरता आले नाही.

First published: July 21, 2018, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading