LockDown: दागिने खरेदीसाठी गेला अन् नवरीच घेऊन आला, आईवडिलांशिवाय उरकलं लग्न

लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक लग्न सोहळे रद्द करण्यात आले आहेत. मात्र रतलाममध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर एक छोटेखानी लग्न सोहळा पार पडला आहे. (फोटो सौजन्य- सुधीर जैन)

  • Share this:

संपूर्ण देश लॉकडाऊमध्ये असताना मध्य प्रदेशमधील रतलाम याठिकाणी एक अनोखं लग्न पार पडलं. आणि ते सुद्धा नवरा-नवरीने मॅचिंग मास्क लावून हे लग्न केलं.

अक्षय्य तृतीये दिवशी हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा किस्सा असा झाला की, गेल्या महिन्यात 20 मार्चला नरेंद्र पीरताणी हा पेशाने सीए असणारा मुलगा लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करण्यासाठी रतलाममध्ये आला होता. त्यानंतर काही दिवसातच लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे तो तिथेच अडकला.

या लग्नाला त्याच्या होणाऱ्या बायको आरती राठीचा परिवार उपस्थित होता. लॉकडाऊनमुळे त्याच्या आईवडिलांना या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही.

लॉकडाऊनमुळे त्यांनी छोटेखानी लग्न पार पडलं. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करून आणि डिझायनर मास्क लावून हे लग्न पार पडलं.

या लग्नाला मुलाच्या आई वडिलांनी व्हिडीओ कॉलवरून वधू-वरांना आशीर्वाद दिले. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करणे हे लक्ष्य ठेवून आम्ही सोहळा पार पडल्याचे दोन्ही कुटुंबांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या रतलाममध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 29, 2020, 7:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या