राशनच्या धान्याचा काळाबाजार, 90 क्विंटल धान्य जप्त

राशनच्या धान्याचा काळाबाजार, 90 क्विंटल धान्य जप्त

शाळेत पोषण आहाराचा हा सर्व माल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

  • Share this:

गोंदिया 25 जुलै : गरीबांसाठी असलेल्या राशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार होत असल्याचं उघड झालं असून लाखो रुपये किंमतीचा तब्बल 90 क्विंटल धान्याचा साठा पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एक मोठं रॅकेट असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

अमृता खानविलकरने शेअर केले हॉट फोटो, या कारणासाठी आहे चर्चेत

गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथे नेवालाल यशवंत पटले यांच्या घरात राशनचा अवैध तांदुळाचा साठा असल्याची गुप्त माहीती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा विभागास मिळाली होती. पोलिसांनी तहसिलदारांना सोबत घेत छापा टाकला. या छाप्यात नेवालाल पटले यांच्या घरात 180 पोते अवैध तांदुळाचा साठा आढळुन आला आहे. तहसीलदारांनी पंचासमक्ष पंचनामा करत  धान्याचं वजन करुन सर्व साठा जप्त केला. आता हे धान्य शासकीय गोदाम गोरेगाव येथे ठेवण्यात आलंय.

महाभयंकर! गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारून वाघिणीला ठार मारलं LIVE VIDEO

नेवालाल पटले यांनी चौकशी दरम्यान मोहाडी या गावच्या विलास बघेले यांनी हा तांदूळ आणुन ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.  तर हा तांदूळ पोत्यावरील अंकीत मार्कानुसार शासकीय असल्याने पंचनामा करण्यात आला. विलास बघेले हा  गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या गावचा राहणारा आहे.राशनचा धान्य पुरवढा करणाऱ्यांशी त्याची ओळख होती. शाळेत पोषण आहाराचा हा सर्व माल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात असलेल्या सर्वांची कसून चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या