'ठाकरे' सिनेमा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच - अजित पवार

'ठाकरे' सिनेमा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच - अजित पवार

'बहुचर्चीत 'ठाकरे' सिनेमा हा लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन रिलीज करण्यात येणार' असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 27 डिसेंबर : 'बहुचर्चीत 'ठाकरे' सिनेमा हा लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन रिलीज करण्यात येणार' असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 'ठाकरे सिनेमा प्रदर्शित करून भावनिक मत मागण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत' असल्याचंही ते म्हणाले.

"ठाकरे या सिनेमाचे निर्माते हे शिवसेनेचे खासदारच आहेत." त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावरच हा सिनेमा रिलीज करण्यात येणार अशी टीक अजित पवार यांनी केली.

दरम्यान, बुधवारी बहुचर्चीत 'ठाकरे' सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलं. त्यासाठी मुंबईत जय्यत तयारी करण्यात आली. ढोल-ताश्यांच्या गजरात, मोठ्या दिग्गजांसमवेत ठाकरे सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं. त्यामुळे सध्या त्याचाच बोलबाला आहे.

शिवसेनेवर टीका करताना अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला आहे. 'संजय गांधी निराधार योजनेचे 600 रुपये देता येत नाहीत तर मग सरकार जाहिरातींवर करोडो रुपये कसं खर्च करू शकतं' असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले की, 'कपिल पाटील साहेब पत्र न पाठवता चर्चा करू शकलो असतो, समविचारी पक्ष म्हणून एक होण्याचा मनोदय असेल तर सर्व अटी मान्य होतील का?' असा सवालही  अजित पवार यांनी उपस्थित केला.

तर यावेळी जागावाटपाच्या मुद्द्यावरून बोलताना 'कुणाच्या मुलाने कुठून निवडणूक लढवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.' असा टोलाही पवारांनी राधाकृष्ण विखे पाटीलांना हाणला.

तर 'नंदुरबार, रावेर, अहमदनगर, यवतमाळ , वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या जागावाटप अजून बाकी आहेत' असंही ते म्हणाले.


VIDEO : ...आणि संभाजी महाराज रायगडावर पोचले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 03:22 PM IST

ताज्या बातम्या