Home /News /news /

राशीभविष्य : धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना ठेवा खर्चावर नियंत्रण

राशीभविष्य : धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना ठेवा खर्चावर नियंत्रण

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 10 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- दिवास्वप्न पाहाणं बंद करा. आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी आपण पैसे कमवू शकता. अचानक आलेल्या समस्यांमुळे ताण येईल. वृषभ- भावनिकरित्या आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला नाही. आपल्या हट्टी स्वभावामुळे इतरांना त्रास होणार नाही यांची काळजी घ्या. मिथुन- आज आपला मूड बदलणं गरजेचं आहे. आज सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. व्यवहार करताना कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. कर्क- आज आपली मेहनत फळाला येईल. आर्थिक लाभ निश्चित आहे. नव्या संधी मिळतील आणि जोडीदारासोबत रोमँटिक मूड असेल. सिंह- जुन्या गुंतवणुकीमुळे उत्पन्न वाढेल. आज आपल्या पदरी निराशा येईल पण थोडा संयम राखणं आवश्यक आहे. कन्या- आज बोलताना स्वत:च्या जीभेवर नियंत्रण ठेवा. आळस झटकून मेहनत केल्यास आपल्याला मोठा फायदा होईल. हे वाचा-अजब प्रथा! हसत हसत या महिला का खातात चाबकाचे फटके? तुळ- आत्मविश्वास वाढेल आणि आज आपली प्रगती निश्चित आहे. कामात अनेक अडथळे येतील पण प्रवास फायद्याचा ठरेल. वृश्चिक- धीर आणि संयम राखणं गरजेचं आहे. समजूदारपणा आपल्याला यशापर्यंत घेऊन जाईल. वाईट सवयींमुळे आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. धनु- वेगानं वाहन चालवणं महागात पडू शकतं. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा, समस्यांचा सामना करावा लागेल. मकर - आज आपल्याला आरामाची गरज आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. आज आपल्याला तणावापासून मुक्तता मिळवणं गरजेचं आहे. कुंभ- गर्भवती महिलांनी आज सावधगिरी बाळगायला हवी. पैशाचं योग्य नियोजन करा असलेला पैसा जपून वापरा. अफवा आणि मित्रांनी सांगितलेला गोष्टींवर डोळेझाकपणे विश्वास ठेवू नका. मीन- आज प्रिय व्यक्तीसोबत आपला वेळ खूप छान जाई. आज आपला मूड देखील चांगला असेल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या