Home /News /news /

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीच्या हाती लागणार मोठं प्रोजेक्ट; कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीच्या हाती लागणार मोठं प्रोजेक्ट; कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 5 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 5 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या वाट्याला आलेलं एखादं काम व्यवस्थित पार पडणार नाही. तुमच्याशी संपर्क साधू इच्छिणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर रहाल. जुन्या नेहमीच्या गोष्टींमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांबद्दल असणारी एखादी चिंता दूर होईल. थोडा आराम मिळेल. LUCKY SIGN – A Salt lamp वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमच्या ओळखीतील काही लोक हे तुमच्या आयुष्यात केवळ गोंधळ निर्माण करायला आलेले आहेत. त्यांच्या अव्यावहारिक मागण्यांमुळे वा वृत्तीमुळे तुम्हाला आजपर्यंत बराच त्रास झाला असेल. आज मात्र अशा लोकांपासून कोणताही त्रास होणार नाही. एखादं मोठं प्रोजेक्ट वा प्रॉपर्टी तुमच्या दिशेने येत आहे. तुम्हाला ‘आउट ऑफ टर्न फेव्हर्स’ची गरज भासू शकते. तुमचा बिझनेस असेल तर, डेडलाईन वाढवून मागण्याची वेळ येऊ शकते. LUCKY SIGN – A Sage burner मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) सध्या डिमांडमध्ये असलेल्या एखाद्या गोष्टीवर तुम्ही काम करत आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी नव्या डेव्हलपमेंट होत असतील, तर तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. बिझनेस वाढवण्यासाठी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून, किंवा एखाद्या स्कीममधून पैसे मिळतील. LUCKY SIGN – A Shimmering cloth कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही ज्या व्यक्तीचे फॅन आहात, अशी एखादी सेलिब्रिटी किंवा प्रभावशाली व्यक्ती तुम्हाला भेटेल. सहली आणि प्रवासाचे योग आहेत. एखाद्या छोट्या वादाचं पर्यवसान मोठ्या भांडणात होऊ शकतं, मात्र ते वेळीच निस्तरलंही जाईल. तुमच्या वर्तणुकीमुळे मनाला काहीशी अशांतता येईल. इतरांसाठी गोष्टी आयोजित करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर असेल. LUCKY SIGN – A New shop सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादी परीक्षा देण्याच्या किंवा कुठे प्रवेश घेण्याच्या तयारीत असाल, तर तुमचा विचार अगदी योग्य आहे. तुमचं नशीब आज जोरावर राहील. घरगुती गोष्टींकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होईल. दैनंदिन गोष्टींचा परिणाम कामावरदेखील होईल, मात्र तो तात्पुरता असेल. मेडिटेशन किंवा एखादी अध्यात्मिक सवय फायद्याची ठरेल. LUCKY SIGN – A Serum कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) एखादी मोठी संधी तुमच्या दिशेने चालून येत आहे. त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. ही गोष्ट तुमच्या अपेक्षेपेक्षा काहीशी वेगळी असेल, मात्र तरीही तुम्ही संपूर्ण जीव लावून त्यावर काम करणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी सीन क्रिएट करणं टाळा. नवीन सहकाऱ्यासमोर चांगली छाप पडेल याची काळजी घ्या. स्वतःचं आणि इतरांचं मनोरंजन करण्यासाठी उत्तम दिवस. LUCKY SIGN – A New poster तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आतापर्यंत एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही घेतलेली मेहनत सर्वांवर छाप पाडेल. तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न काही लोक करतील. मात्र, परिस्थिती तुमच्या हातातच राहील. शेजाऱ्यांचा त्रास संभवतो, मात्र त्यावर काही उपाय नाही. तुम्हाला शेजाऱ्यांकडे दुर्लक्ष करावं लागेल. एखादी गोष्ट विनाकारण सर्वांना सांगत बसू नका. ज्यांना या गोष्टी कळू नये अशा काही व्यक्तींच्या कानांपर्यंत या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचू शकतात. LUCKY SIGN – A Tree of life वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमचा दृढनिश्चय आणि फोकस यामुळे अगदी अनपेक्षित अशी गोष्ट तुम्ही मिळवाल. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या कामाच्या पद्धतीबाबत सावध होतील. तुमच्या शैलीनुसार काम करण्यासाठी या वेळेचा फायदा घ्या. एखाद्या अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. एखादं नवीन आणि दीर्घकालीन साधन तुमच्या नशिबात आहे. आणि हे साधन कदाचित खुणावेल. LUCKY SIGN – A Coral धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्हाला तुमचे अनुभव आले असतील, मात्र तरीही तुम्हाला त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याची परवानगी मिळत नाही. तुम्हाला मनापासून एखाद्याविषयी काळजी वाटत असली, तरीही सध्या दोन पावलं मागे येणंच उत्तम. एखादी व्यक्ती फार काळापासून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल, तर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या काही परवानग्या मिळण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागेल. LUCKY SIGN – A Shopping Bag मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दुसऱ्यांच्या चुकांसाठी तुम्हाला होणारी शिक्षा थांबेल. भूतकाळातील एखादी घटना तुम्हाला पुन्हा थोडं मागे घेऊन जाईल. तुम्ही कर्जासाठी अर्ज केला असेल, तर अप्रूव्हल मिळण्यासाठी आणखी थोडं थांबावं लागेल. अचानक मित्रांसोबत बाहेर जेवणाचा प्लॅन ठरू शकतो. आजचा दिवस आरामाचा आहे. आतापर्यंत टाळत आलेल्या एखाद्या आजाराकडे आज लक्ष द्यावं लागेल. LUCKY SIGN – Fresh paint कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आज आरोग्याचे प्रश्न उद्भवतील, मात्र त्यांना नीट हाताळाल. तुमच्या नियंत्रणात नसलेल्या एखाद्या गोष्टीचा अतिविचार कराल. यामुळे गरजेच्या गोष्टींकडे तुम्हाला म्हणावं तितकं लक्ष देता येणार नाही. तुम्हाला अतिचिंता करणं टाळण्याची, स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची आणि मेडिटेशन करण्याची गरज आहे. लवकरच आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. LUCKY SIGN – A Black tourmaline मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखादं प्रकरण प्रमाणापेक्षा जास्त ताणणं योग्य नाही. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद सुरू असतील, तर आज त्यांची बाजू ऐकून घ्या. तुमच्यामध्येही काही दोष असतील, ते जाणून घेऊन त्यावर काम करा. छोट्याछोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे दोघांमधील अंतर वाढतच जातं, हे लक्षात घ्या. तुम्हाला वेळेवर एखादा चांगला आणि फायद्याचा सल्ला मिळेल. एखाद्या गेट-टुगेदर वा पार्टीला उपस्थित रहाल. LUCKY SIGN – A Polka dots dress
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

    पुढील बातम्या