• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राशीभविष्य: मूळ नक्षत्र, गौरीविसर्जनाचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?

राशीभविष्य: मूळ नक्षत्र, गौरीविसर्जनाचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?

आज मंगळवार दिनांक 14 september 2021.आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करणार आहे. आज ज्येष्ठा गौरी उत्थापन. मूळ नक्षत्र असेल.

  • Share this:
    आज मंगळवार दिनांक 14 september 2021.आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करणार आहे. आज ज्येष्ठा गौरी  उत्थापन. मूळ नक्षत्र असेल. पाहूया आजचे राशी भविष्य. मेष आजचा दिवस मेष राशीला भाग्य कारक आहे. व्यावसायिक  निर्णय  घ्यायचे असतील तर थोडे  थांबा.  धार्मिक कार्य होईल. आर्थिक गणित जुळून येईल. घराकडे  लक्ष असू द्या. दिवस बरा आहे. वृषभ आज  आठवा चंद्र .अत्यंत जपुन काळजीपूर्वक दिवस घालवा. शक्यतोवर  घरात  शांतपणे  रहा. वाहन, दुखापत, यापासून जपा. पोटाची काळजी  घ्या. प्रवास  नकोच. दिवस  मध्यम. मिथुन आज तुम्हाला फारसे  काही ना करता घरी आरामात  दिवस  घालवावा  अशी इच्छा होईल. मुल आनंद देतील. घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. छोटेसे  काही  काम असेल तर दोघांनी मिळून करावे. आर्थिक व्यवहार जपून. दिवस मध्यम जाईल. कर्क आज शरीर विश्रांतीची  मागणी करेल. आठवडा भर दगदग  केल्यामुळे  आज थकवा वाटेल. आराम करा. कोणाशी  बोलाचाली, शत्रुत्व नकोच. दिवस अगदी  शांतपणे घालवा. दिवस  मध्यम. सिंह सध्याचा काळ जोडीदाराची भरभराट करणारा आहे. कामाच्या ठिकाणी अचानक संधी, उत्कर्ष  होईल. मुले आज  तुमचा वेळ  घेणार आहेत. पित्त किंवा श्वासाचा त्रास असेल तर जपून. मंगळ द्वितीयात कुटुंबा साठी  खर्च करेल. दिवस  बरा आहे. कन्या आज दिवस पाहुणे रावळे  येण्याचा  त्यांची  सरबराई करण्याचा  आहे. समाजात, मित्र मैत्रिणींना भेटणे तुम्हाला आवडते. पण फार कष्ट करू नका.  घरात  भरपूर काम पडेल. भाग्यशाली दिवस. तुला आज, तुमचे काही प्रवासाचे कार्यक्रम ठरले असतील. पण जपून रहा.मंगळ रवि व्ययस्थानी, कुठेही  अनावश्यक धाडस  नको. काही कारणाने  आर्थिक खर्च  पण बराच होईल. भावंडाची भेट होईल. दिवस  चांगला आहे. वृश्चिक आर्थिक लाभ, त्याबरोबर कौटुंबिक,सामाजिक जबाबदाऱ्या, त्यासाठी  कष्ट  असा आजचा दिवस आहे. अजाणता कोणाला शब्द देऊ नका. राशीतील केतू धार्मिक कार्यासाठी शुभ आहे. दिवस  उत्तम. धनु राशीतील चंद्र , प्रगतीशील दिवस. मन  स्थिर राहील. प्रवास टाळा. घरात शांतता राहील. शत्रू दबून राहतील. आरोग्य छान राहील. आज दिवस  शांततेने व्यतीत करण्याचा आहे. मकर आज कुणावर  विसंबून राहणे  तुम्हाला  महागात पडेल. व्ययस्थानातील चंद्र तुम्हाला  त्रासदायक ठरू शकतो. मकर राशीच्या  व्यक्तीसाठी आजचा दिवस जपून राहण्याचा आहे. कुंभ राशीत गुरू अणि लाभात चंद्र आज तुम्हाला  शुभ फळ  देईल. मात्र   अष्टमात मंगळ रवि आहे. अवाजवी धाडस करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा.  दिवस चांगला. मीन कुठल्याही प्रकारे  तुम्हाला व्यस्त ठेवणारा आज दिवस आहे. यश मिळेल पण काम एकाग्रतेने करा. परिस्थितीनुसार  निर्णय घ्या. आर्थिक बाजू  सांभाळा.  दिवस चांगला  आहे. शुभम भवतु!!
    First published: