Home /News /news /

Daily Horoscope : जोडीदाराशी संबंध बिघडण्याचे योग, जाणून घ्या कसा जाईल दिवस!

Daily Horoscope : जोडीदाराशी संबंध बिघडण्याचे योग, जाणून घ्या कसा जाईल दिवस!

दिनांक १३ जून २०२२. सोमवार. ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी. रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा सुरू होईल. वटसावित्री व्रत प्रारंभ होईल. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १३ जून २०२२. सोमवार. आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी.रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा सुरू होईल. वटसावित्री व्रत प्रारंभ होईल.आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत होणार आहे.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र अष्टम स्थानात असून आर्थिक, मानसिक ताण येईल. व्यय मंगळ प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे. कायद्याचे बंधन पाळा. मध्यम दिवस. वृषभ राशीच्या सप्तमात चंद्र आज आर्थिक शुभ वार्ता देईल. मित्र मैत्रीणीना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे. मिथुन कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध बिघडण्याचे योग आहेत. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ. कर्क भाग्य कारक दिवस असून धार्मिक गोष्टीत मन रमेल. संतती संबंधी शुभ काळ. मेजवानीचा योग येईल. प्रवास होतील. एकूण दिवस समाधानात जाईल. सिंह आज चतुर्थ चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल . फार ताण घेऊ नका. जास्तीचे काम पडेल. शांत राहून दिवस घालवा. कन्या तृतीय स्थानातील चंद्र जीवनात गोडी निर्माण करेल. मौज मजेसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. घरगुती कार्यक्रम होईल. भावंडं भेटतील. आनंद आणि उत्साहात दिवस पर पडेल. तुला आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षणआणि कार्य क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला. वृश्चिक संततीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. धनु आज कार्यक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. व्यय स्थानातील चंद्र खर्चात वाढ करेल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ. मकर प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. भावंडा सोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील. कुंभ आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनि सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ. मीन भाग्य स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य देईल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात यशस्वी व्हाल. उत्तम असा दिवस आहे. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या