मुंबई, 08 जुलै : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसात कोणत्या समस्या आहेत यांची चाहूल लागली तर त्या सोडवणं अधिक सोपं जातं. यासाठीच कसा असेल 8 जुलैचा आपला दिवस जाणून घ्या.
मेष- आर्थिक चणचण भासणार नाही. आपल्या निष्काळजीपणामुळे आरोग्य बिघडू शकते. वैवाहिक जीवनात अडथळे येतील.
वृषभ- नकारात्मक विचारांचा आपल्या कामावर परिणाम होऊ शकतो. रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवणं फायद्याचं आहे.
मिथुन- तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क- समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात आज आपल्याला यश येईल. व्यवहार आणि व्यवसायाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा.
सिंह- आरोग्य चांगलं राहिल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. भविष्याची योजना आखा.
हे वाचा-आलिशान बंगल्याप्रमाणे आहे किंग खानची Vanity; पाहा INSIDE PHOTO
कन्या- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा दिवस आपल्यासाठी कंटाळवाणा असू शकतो.
तुळ- घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
वृश्चिक- प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस विवादास्पद राहिल. खर्चाचं बजेट बसवा.
धनु- कामाचा अतिरिक्त ताण असल्यानं चिडचिड होईल. अचानक आलेल्या खर्चामुळे आर्थिक ताण वाढेल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस उत्तम असेल.
मकर - नियमित व्यायाम करा. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. वाईट वाटून घेऊ नका.
हे वाचा-जास्त खाल्लं नाही तरी तुमचं पोट फुगतं? असू शकतो पोटाचा गंभीर आजार
कुंभ- आरोग्य चांगलं राहिल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात अडकू नका. नवीन कामांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
मीन- आत्मविश्वास वाढवा आणि सकारात्मक विचार करा. समस्यांचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आपलं म्हणणं ऐकलं जाईल.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.