मुंबई, 29 मार्च : आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे दिवसभरात अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 29 मार्चचं राशीभविष्य.
मेष - मानसिक त्रास जाणवेल. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. सगळी कामं आपल्या मनाप्रमाणे होतीलच असे नाही.
वृषभ- आज आपण बोलाल तेच कराल. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल.
मिथुन - आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. पार्टनरसोबत वाद होतील.
कर्क - खाण्यावर लक्ष द्या. मित्र, कुटुंबासोबत आजचा आपला दिवस चांगला जाईल. भागीदारी व्यवसायात फायदा मिळेल.
सिंह - शारीरिक कामं आज जास्त करू नका. त्यामुळे थकवाा जाणवेल. योग्य सल्ल्यानं पैशांची गुंतवणूक करा. खरं प्रेम मिळवण्यात अपयश मिळेल.
कन्या - प्रेम प्रकऱणांमध्ये पार्टनरचे गुलाम बनू नका. आज आपल्याला ताण जाणवेल. मेहनत करावी लागेल मात्र फळ लगेल मिळेलच याची शाश्वती नाही.
तुळ - आरोग्य सुधारण्यावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक - कामाचा ताण असल्यानं चिडचिडेपणा जाणवेल. प्रेमामुळे आपल्याला दु:ख होऊ शकतं. जोडीदारासोबत संवाद साधा.
धनु - दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. प्रेमातून आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला आहे.
मकर - रिअल इस्टेट गुंतवणूक आपल्याला महत्त्वपूर्ण नफा देईल. प्रेमात पडाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
कुंभ- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्तीच्या प्रेमाची आज आपल्याला खऱ्या अर्थानं जाणीव होईल. जोडीदाराच्या मदतीने आपण सहजपणे जीवनातील अडचणींचा सामना करू शकता.
मीन- आजचा दिवस सर्वात चांगला आहे. घरगुती सुविधांवर जास्त खर्च करु नका. प्रिय व्यक्तीस आपल्याबरोबर सतत रहाण्यात खूप त्रास सहन करावा लागतो. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सन्मान दुखावला जाऊ शकतो.