राशीभविष्य : सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्यायला हवी विश्रांती

राशीभविष्य : सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्यायला हवी विश्रांती

12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? कोणत्या राशीसाठी असेल शुभ जाणून घ्या राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आजची संध्याकाळ मित्रांसोबत खूप चांगली जाईल. नवीन कल्पना तुम्हाला आर्थिक फायदेशीर ठरेल. आपल्या आळशी आणि निराशेच्या मनःस्थितीमुळे आपण कार्यालयात वादाचे केंद्र बनू शकता.

वृषभ- आज आपल्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद असेल. आज आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन- दुसऱ्यांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका. आज आपल्याला विश्रांतीची गरज आहे. आज आपल्याकडे असलेल्या वेळेचं योग्य नियोजन करा.

कर्क- खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या. महत्त्वाची कामं मध्यावर अडकतील. आज आपण सोशल मीडियाचा अधिक वापर करणं टाळावं.

हे वाचा-Depression वर कशी करावी मात; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय

सिंह- आज आपल्याला थकल्यासारखं वाटू शकतं.

कन्या- आज आपल्या प्रेमाला नवी दिशा मिळेल. गाडी चालवताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आज वाद आणि तणावाचा सामना करावा लागेल.

तुळ- आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज आपल्याला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील.

वृश्चिक- आज आपली मानसिक शांतता बिघडी शकते. आज जुनं आणि भूतकाळ विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करा. आजचा दिवस खूप चांगला आहे.

धनु- एकतर्फी प्रेमात वेळ वाया घालवू नका. आज आपण स्वत:ला खूप व्यस्त ठेवाल.

मकर - आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज आपल्याला आर्थिक बजेट बसवण्याची गरज आहे.

कुंभ- आज कोणत्याही वचनात अडकू नका. आज आपली चिडचिड होऊ शकते आणि थकल्यासारखं वाटू शकतं.

मीन-आज आपले छंद जोपसण्यावर भर द्या. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 20, 2020, 7:31 AM IST

ताज्या बातम्या