राशीभविष्य : वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना आज आहे विश्रांतीची गरज

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- संकटात असलेल्या व्यक्तीला आपली गरज आहे. तिला मदत करा. आजचा दिवस तुमच्या क्षेत्राच्या दृष्टीकोनातून आहे. त्याचा पूर्ण फायदा घ्या. वृषभ- आपल्याला विश्रांती घेणं खूप आवश्यक आहे. वस्तू विकत घेण्यापूर्वी तुमच्याकडे असलेल्या वस्तू वापरा. मिथुन- प्रलंबित कामामध्ये आपण व्यस्त राहाल. जबाबदाऱ्या पार पाडाल. आज विश्रांती घेण्यासाठी फारच कमी वेळ आहे. कर्क- मतं व्यक्त करण्यात अजिबात संकोच करू नका. आपल्या प्रगतीत अडथळा येईल. सिंह- प्रेमात थोडी निराशा वाटेल. एकटेपणाची भावना खूप वाईट आहे. कन्या- जास्त मानसिक दबाव आणि थकवा यामुळे समस्या उद्भवू शकतात. चांगले आरोग्य राखण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. तुळ- . ऐकलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या सत्याची कसून परीक्षा घ्या. वृश्चिक- समजूदारपणाची परीक्षा घेतली जाईल. आज आपली चिडचिड होण्याची शक्यता आहे. धनु- कोणत्याही वचनात अडकू नका. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा होऊ शकतो. मकर - आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. नवीन भागीदारी या दिवशी फलदायी होईल. कुंभ- सकारात्मक विचारांनी पावलं उचला. योजना अंमलात आणण्यासाठी व नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगले दिवस. मीन-कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या स्वभावामुळे आपल्याला त्रास होईल.
    First published: