मुंबईत धक्कादायक प्रकार, युवकाने केला कुत्रीवर बलात्कार

मुंबईत धक्कादायक प्रकार, युवकाने केला कुत्रीवर बलात्कार

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी युवकाने कुत्रीच्या तोंडामध्ये प्राईव्हेट पार्ट टाकण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

नवी मुंबई, 23 ऑगस्ट : नवी मुंबई भागात एका व्यक्तीला भटक्या कुत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 'पीटा' या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीने प्राणी कार्यकर्ते विजय रंगरे या प्रकरणात पोलिसांता तक्रार दाखल केली आहे. तर यापूर्वीही आरोपीने व्यक्तीने अनेक प्राण्यांसह असं कृत्य केल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा खारघर परिसरात राहणारा व्यक्ती आहे. बलात्काराचं हे प्रकरणदेखील याच परिसरात घडलं आहे. आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 377 नुसार एखाद्या प्राण्याबरोबर माणसानं बलात्कार करणं हा गुन्हा आहे आणि यासाठी दोषी व्यक्तीला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

मानसोपचार तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार प्राण्यांसह बलात्कार करणारा व्यक्ती हा मानसिकरित्या डिस्टर्ब असतो. त्याला प्रचंड मानसिक तणाव असतो. तर खारघरमधील कुत्र्यावर बलात्काराचा व्हिडिओ हा स्वातंत्र्यदिनी व्हायरल करण्यात आला होता. त्यावर कारवाई करत खारघर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हिस्ट विजय रंगरे यांनी आरोपी व्यक्तीचा शोध घेत त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. एनबीटी या वृत्तवीहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे.

इतर बातम्या - जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

विजय रंगरे यांनी पीडित कुत्रीचादेखील शोध घेतला. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणी अहलावानुसार, कुत्रीवर बलात्कार झाला असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आरोपी व्यक्तीस 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर पालकांमध्ये आणि तरुणाईमध्ये भीतीचं वातावरण आहे.

इतर बातम्या - मेट्रोमध्ये तरुणीने केलं फोटोशूट, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी युवकाने कुत्रीच्या तोंडामध्ये प्राईव्हेट पार्ट टाकण्याचा प्रयत्न केला. आणि कुत्रीला मारहाणही केली. पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचीदेखील वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 23, 2019, 3:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading