पुणे, 10 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिक्रापूर इथल्या हिवरे रोड परिसरातील एका अल्पवयीन युवतीवर एका इसमाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली समोर आली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनला सदर इसमावर तसेच त्याला मदत करणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून शिक्रापूर इथल्या एका अल्पवयीन युवतीच्या घरी आरोपी दिपक ठोंबरे हा नेहमी येत होता आणि ठोंबरेच्या घरीही युवती तिच्या आजीसोबत जात होती. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झालेली. त्यांनतर दीपक वेळोवेळी युवतीशी शारीरिक जवळीक करू लागला. त्याने युवतीला आपण मॉलमध्ये फिरायला जाऊ असे सांगून तिला पुण्यामध्ये घेऊन जात लॉजमध्ये नेलं. तिथं तिच्यावर बलात्कार केला.
कंगनाच्या कुठल्याही टीकेला शिवसेना देणार नाही उत्तर, नेत्यांना महत्त्वाचा आदेश
आरोपी दिपक वारंवार युवतीवर अत्याचार करत राहिला आणि नंतर युवतीने तिच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली. यानंतर पीडितेच्या घरच्या कुटुंबियांनी आणि नातलगांनी बैठक घेत बदनामी नको म्हणून तक्रार न देता दिपकला समजावून सांगितलं. मात्र, तरी देखील दिपक हा वेळोवेळी युवतीच्या मैत्रिणींच्या मोबाईलवर संपर्क करून त्रास देत राहिला. त्यांनतर दिपकने त्याचा मित्र गणेश शिंदे याच्या मदतीने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून हडपसर इथे घेऊन गेला.
दुचाकीमुळे पुण्यात वाढला कोरोनाचा धोका, मुंबईलाही टाकलं मागे
"तुझं कुठंही लग्न होऊ देणार नाही, तू ऐकले नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकेन" अशी धमकी दिली. तिथे गणेश शिंदेच्या आणि एका महिलेच्या मदतीने युवतीला हडपसर पोलीस स्टेशन इथे घेऊन जाऊन आई वडिलांच्या विरोधात बोलण्यास सांगितलं. त्यावेळी युवतीने तिथल्या पोलिसांना मला वडिलांकडे जायचे आहे असे सांगितले.
महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांना जाणारा ऑक्सिजन थांबवला, MPमध्ये भयावह परिस्थिती
पोलिसांनी तात्काळ युवतीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेत युवतीला त्यांच्या ताब्यात दिलं. त्यांनतर युवतीने घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला. ऐवढं सगळं झाल्यानंतरही आरोपी दिपक पीडितेच्या घराभोवती फेऱ्या मारत होता. अखेर यावर पिडीत युवतीने दिपक बद्दल शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. यानंतर शिक्रापूर पोलिसांनी दिपक उर्फ दत्तात्रय कुंडलिक ठोंबरे व त्याचा मित्र गणेश शिंदे अशा दोघांना अटक केली. या दोघा आरोपींविरुद्ध बलात्कार, दमदाटी तसेच बाल लैंगिक अत्याचारासह आदी गुन्हे दाखल केले करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.