अनैसर्गिक कृत्य करत विवाहित महिलेवर 3 वर्ष केला बलात्कार, नराधमाला अखेर अटक

अनैसर्गिक कृत्य करत विवाहित महिलेवर 3 वर्ष केला बलात्कार, नराधमाला अखेर अटक

या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 19 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात अहमदनगरमध्ये बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील पळशी इथं महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. अनैसर्गिक कृत्य करून बलात्कार केल्या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निराधार महिलेस तुला आणि तुझ्या मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली 3 वर्षे अनैसर्गिक कृत्य करत बलात्कार करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे.

काळजी घ्या! वेगाने वाढतोय कोरोना रुग्णांचा आलेख, वाचा आजची नवी आकडेवारी

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव आग्रेवाडी, इथं रहाणाऱ्या रावसाहेब विनायक विधाटे याने 2017 पासून पीडित महिलेस मुलीच्या लग्नाच्या, तिला सांभाळण्याच्या बहाण्याने तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी शारीरीक सबंध ठेवून अनैसर्गिकरित्या बलात्कार करायचा. त्यास विरोध केल्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करायचा.

फिर्यादीच्या मुलीने दवाखान्यातील उपचारासाठी पैशांची मागणी केली असता आरोपीने शिविगाळ करून तुझा आणि माझा काही सबंध नाही, तू तुझ्या घरी निघून जा आणि माझ्या विरोधात कुठे तक्रार केली तर तुला आणि तुझ्या आईला मी जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रावसाहेब विधाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

ड्रग्ज प्रकरणात उर्मिला मातोंडकरांच्या अडचणी वाढल्या, वकिलानं बजावली नोटीस

खरंतर, अहमदनगर जिल्ह्यात बलात्कार, दरोडे घर फोड्या, खून या घटनांनामध्ये वाढ होत आहे. 3 मंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशात सर्सास गुन्हे समोर येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक नाही का? असा सवाल उपस्थित केला जातो.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 19, 2020, 10:24 AM IST
Tags: rape news

ताज्या बातम्या