नराधम दिराकडून लहान भावाच्या बायकोवर बलात्कार, मुंबईजवळील घटनेनं खळबळ

लहान भावाची 23 वर्षीय पत्नी ही घरात एकटीच असताना ती मोबाईलवर गेम खेळत बसली होती. त्यावेळी नराधम दिर निलेश याने घराच्या दरवाज्याची आतून कडी लावून वहिणीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 10:53 AM IST

नराधम दिराकडून लहान भावाच्या बायकोवर बलात्कार, मुंबईजवळील घटनेनं खळबळ

भिवंडी, 12 जुलै : नात्याचं भान न राखता तरुणाने वहिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वहिणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत दिराने वहिणीवर बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर दिराला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकरी आणि कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

वहिणी एकटीच घरात असल्याची संधी साधून नराधम दिराने अमानूष बलात्कार केल्याची घटना वेताळ पाडा इथं घडली आहे. निलेश रामलखन जैसवाल ( 30) असं अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधम दिराचं नाव आहे. निलेशने त्याच्या लहान भावाच्या पत्नीवर बलात्कार केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

लहान भावाची 23 वर्षीय पत्नी ही घरात एकटीच असताना ती मोबाईलवर गेम खेळत बसली होती. त्यावेळी नराधम दिर निलेश याने घराच्या दरवाज्याची आतून कडी लावून वहिणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली. या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने पतीला या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : धक्कादायक, गाडीतलं पेट्रोल काढून मुलाने आईला जिवंत जाळलं!

या सगळ्या प्रकारानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम दिर निलेश याच्या विरोधात भादंवि. 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच नराधम दिर फरार झाला असून त्याचा शोध तपास अधिकारी एपीआय संतोष बोराटे घेत आहेत.

Loading...

VIDEO : मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का बसणार, गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...