मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबई हादरली, इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या MBA तरुणीवर नराधमाने केला बलात्कार!

मुंबई हादरली, इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या MBA तरुणीवर नराधमाने केला बलात्कार!

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर नराधमाने बलात्कार केला.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर नराधमाने बलात्कार केला.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर नराधमाने बलात्कार केला.

  • Published by:  Renuka Dhaybar
मुंबई, 24 सप्टेंबर : मुंबईत एका MBA तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर नराधमाने बलात्कार केला. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर जुहू पोलिसांनी आरोपी साहिलसिंग अरोरा याला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी मुळची उत्तर प्रदेळची असल्याचं सांगण्यात येत आहे. MBA झाल्यानंतर नोकरीच्या शोधात तरुणी मुंबईत आली होती. तिला एका खासगी कंपनीत नोकरी लागल्यानंतर ती पेईंगगेस्ट म्हणून इथेच राहत होती. पण पगार कमी असल्यामुळे तिला आर्थिक अडचणी येत होत्या. सगळा खर्च सांभाळून तिला मुंबईत राहणं परवडत नव्हतं. त्यामुळे ती नव्या नोकरीच्या शोधात होती. नोकरीसाठी तिने अनेक ओळखी वाढवल्या होत्या. चांगली नोकरी मिळावी यासाठी तरुणीने तिच्या सगळ्या मित्रांना सांगून ठेवलं होतं. ती ऑनलाईनसुद्धा नोकरी  शोधत होती. जर नोकरी मिळाली नाही तर एप्रिल महिन्यात गावी जाणार असल्याचा निर्णयही तिने घेतला होता. तितक्यात जुलै महिन्याच ऑनलाईन नोकरीच्या शोधात आरोपी साहिलसिंग अरोराच्या संपर्कात आली. नोकरीसाठी ती रोज त्याच्याशी बोलायची. त्याने तिला अनेक नोकऱ्यांचा आमिष दाखवलं. अंधेरीमध्ये एका नामांकित बँकेत HR म्हणून नोकरी देतो असं सांगत त्याने तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. विलेपार्लेच्या किंग्ज इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. पीडित तरुणी तिथे जाताच तिची मुलाखत घेण्याऐवजी आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने मोठी हुशारी दाखवून त्याच्या तावडीतून पळ काढला. घरी येऊन तिने सर्व प्रकार तिच्या मैत्रिनींना सांगितला असता त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं. तरुणीने जुहू पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपी अरोराला ताब्यात घेतलं आहे. तर तरुणीची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद
First published:

Tags: Mumbai rape case, Rape case

पुढील बातम्या