सांताक्रूझमध्ये धक्कादायक प्रकार; जवळच्या मित्रांनी घरात बोलवून केला मैत्रिणीवर बलात्कार, नंतर केली हत्या

सांताक्रूझमध्ये धक्कादायक प्रकार; जवळच्या मित्रांनी घरात बोलवून केला मैत्रिणीवर बलात्कार, नंतर केली हत्या

एका तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • Share this:

सांताक्रूझ, 07 फेब्रुवारी : गेल्या आठवड्याभरात महिला अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्या असताना सांताक्रूझमध्ये बलात्कार आणि हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सांताक्रूझच्या पूर्वेकडील वाकोला इथल्या एका चाळीत हा खळबळजनक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी ही कुटुंबासोबत राहत होती. त्याचवेळी चाळीत एका खोलीत भाड्याने 3 तरुण राहत होते. संध्याकाळी यातील दोघे जण दारू पिण्यासाठी बसले होते. सातच्या सुमारास घरासमोरून पीडित तरुणी गेली. तेव्हा दोघांनी तिला आवाज दिला आणि घरात बोलावलं. दोघांनाही पीडिता ओळखत असल्यामुळे ती घरात गेली.

दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तिच्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली म्हणून दोघांनी तिला बेदम मारहाण करत तिच्या बलात्कार केला. तरुणी कुठे याबद्दल बोलू नये म्हणून नराधमांनी तिची हत्या केली. तिच्या तोंडावर उशी दाबून आरोपींनी पीडितेचा जीव घेतला आणि पळ काढला.

इतर बातम्या - धक्कादायक! 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटात आढळलं 8 महिन्यांचं भ्रूण

जेव्हा खोलीतील तिसरा तरुण आला तेव्हा त्याने तरुणीचा मृतदेह घरात पाहिला. त्याने तात्काळ याची माहिती शेजाऱ्यांना दिली आणि पोलिसांना याबद्दल कळवलं.पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अहवालामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं.

वाकोला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली असून दोन आरोपींना ठाणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं. पण या सगळ्या घटनेमुळे स्थानिकांंमध्ये संताप आहे.

इतर बातम्या - मलालावर गोळ्या झाडणारा दहशतवादी तुरुंगातून पळाला, Audio Clip मधून दिली माहिती

First published: February 7, 2020, 8:41 AM IST

ताज्या बातम्या