VIRAL VIDEO- ‘ऐसे घुमाओ कलाई’ रणवीर सिंगला कपिल देव देतायेत बॅटिंगचे धडे

VIRAL VIDEO- ‘ऐसे घुमाओ कलाई’ रणवीर सिंगला कपिल देव देतायेत बॅटिंगचे धडे

भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं होतं. आता याच घटनेवर रणवीर सिंगचा '83' हा सिनेमा येत आहे.

  • Share this:

धर्मशाला, १९ एप्रिल- भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं होतं. आता याच घटनेवर रणवीर सिंगचा '८३' हा सिनेमा येत आहे. पुढच्या वर्षी १० एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणवीर सिंगसोबत फिल्म में रणवीर के साथ हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण टीम धर्मशाला येथे सराव करत आहे. इथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वतः रणवीरनेही अनेक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला.

रणवीरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धमर्शाला येथे सुरू असलेला सराव स्पष्ट दिसत आहे. रणवीरसह संपूर्ण टीम कसा सराव करते ते दाखवण्यात आले आहे. तसेच १९८३ मधील वर्ल्डकप खेळलेले क्रिकेटर त्यांची शैली शिकवताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना रणवीरने लिहिले की, ‘भारताच्या सर्वात मोठ्या विजयाची आतापर्यंत न ऐकलेली गोष्ट.. १० एप्रिल २०२०. गुड फ्रायडे.’

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगने सिनेमाचा पहिला लुक शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘आजपासून बरोबर एका वर्षाने १० एप्रिल २०२० ला भारताची सर्वोत्तम गोष्ट सांगण्यात येईल.’

कपिल देव यांच्या या बायोपिकमधून त्यांची मुलगी अमियाही पदार्पण करणार आहे. ती या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहे. कबीर खान ८३ सिनेमाचा दिग्दर्शक आहे. सध्या अमिया कबीरची असिस्टंट म्हणून सिनेमाचे काम पाहत आहे.

VIDEO: 'चुनाव का महिना राफेल करे शोर', आव्हाडांचा गाण्यातून मोदींवर निशाणा

First published: April 19, 2019, 5:27 PM IST

ताज्या बातम्या