S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

Viral Photo- रणवीर- दीपिका करतायेत भाजपचा प्रचार?

'एक बिहारी १०० पे भारी' या नावाच्या फेसबुक पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी केशरी रंगाची ओढणी गळ्याभोवती गुंडाळलेली दिसत आहे.

Updated On: Apr 12, 2019 03:16 PM IST

Viral Photo- रणवीर- दीपिका करतायेत भाजपचा प्रचार?

मुंबई, १२ एप्रिल- लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या फेरीचे मतदान गुरुवारी पार पडले. सध्या प्रत्येकावर निवडणुकांचा प्रभाव दिसतो. आता यात बॉलिवूड सेलिब्रिटी तरी कसे वेगळे राहतील. अनेक कलाकारांनी यावर्षी राजकारणात उडी घेतली आहे. अशात सोशल मीडियावर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा एक फोटो ट्रेंड करत आहे. हा फोटो पाहून असं म्हटलं जात होतं की हे दोघं भाजपचा प्रचार करत आहेत. पण यात कोणतीही सत्यता नाही.

View this post on Instagram

And after the puja they posed again #ranveersingh #deepikapadukone #DeepVeerKiShaadi @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


'एक बिहारी १०० पे भारी' या नावाच्या फेसबुक पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी केशरी रंगाची ओढणी गळ्याभोवती गुंडाळलेली दिसत आहे. ओढणीवर वॉ फॉर भाजप नरेंद्र मोदी लिहिलेले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कमळचं बटन दाबून देशाच्या प्रगतीचा एक हिस्सा व्हा.’


View this post on Instagram

Follow me . . . . . . . . . @deepikapadukone @ranveersingh #deepikapadukone #deepikaranveer #deepikaranveerwedding #deepikaqueenofbollywood #deepveerwaaale #deepikapcrazens #deepikabhavnani #deepikaqueenofheart #deepikawedsranveer #deepveer #deepikaqueen #deepveerkishaadi #ranveerkingofbollywood #ranveersingh #ranveer #raamleela #bajiraomastani #bae #baba #love #lovebirds #lovers #king #kingofbollywood #kingofqueen #queen #queenofbollywood #queenofking #♥️♥️♥️♥️♥️❤️

A post shared by #DeepVeerwale (@deepika_queen_of_heart) on


ज्या लोकांना हा फोटो खरा वाटत आहे त्यांना सांगू इच्छितो की, भाजपसाठी मतदान मागणाऱ्यांनी दीपवीरचा हा फोटो फोटोशॉप केला आहे. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा दोघांनी एकत्र फोटो काढले होते. युझरने या फोटोची छेडछाड करून भाजपाला मतदान करा असे त्या केशरी ओढणीवर लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे दीपवीरचा हा फोटोशॉप केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकांच्या काळात असा प्रकरा मतदारांना संभ्रमात पाडू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close