‘गली बॉय’चं ‘दूरी’ गाणं झालं व्हायरल, ट्रेण्डमध्येही पोहोचलं पहिल्या नंबरवर

‘गली बॉय’चं ‘दूरी’ गाणं झालं व्हायरल, ट्रेण्डमध्येही पोहोचलं पहिल्या नंबरवर

'गली बॉय' सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं असून मुंबईतील एका गल्लीत राहणाऱ्या रॅपरची गोष्ट यात सांगितली आहे.

  • Share this:

मुंबई, २८ जानेवारी २०१८- रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय' सिनेमाचं दूरी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. हे गाणं अगदी काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

'कोई मुझको यूं बताए, क्यों ये दूरी और मजबूरी।' असे या गाण्याचे बोल आहेत. २ मिनिटं ३१ सेकंदाच्या या गाण्यात पैश्यांविना जगणाऱ्यांचे हाल सांगण्यात आले आहेत. या गाण्याला ऋषी रिचने संगीत दिलं आहेत. तर जावेद अख्तर आणि डिवाइन यांनी लिहिले आहेत. याआधी सिनेमाची 'अपना टाइम आएगा' आणि 'मेरे गली में' ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.

'गली बॉय' सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं असून मुंबईतील एका गल्लीत राहणाऱ्या रॅपरची गोष्ट यात सांगितली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या कंपनीने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात कल्की कोचलिन आणि विजय राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या सिनेमात रणवीर सिंगने नावेद शेख आणि आलियाने सकीना या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मुंबईतील अंडरग्राउंड रॅपर डिवाइन आणि नयेजी (नावेद शेख) यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या