कपिल देवची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वडिलांच्या 83 सिनेमात करणार काम

कपिल देवची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वडिलांच्या 83 सिनेमात करणार काम

सिनेमाचं पुढील चित्रीकरण धर्मशालामध्ये ठेवण्यात आलं आहे. यानंतर सिनेमाची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी स्कॉटलंड आणि लंडनला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, २६ मार्च- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटमधला पहिला विश्वचषक जिंकला. तो क्षण पुन्हा एकदा सिनेमाच्या रुपात जगण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमातून कपिल देव यांची मुलगी अमिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

८३ सिनेमात अमिया सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात ती कबीर खानला असिस्ट करताना दिसणार आहे. या सिनेमात संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील त्याच्या बाबांचीच भूमिका साकारताना दिसणार आहे.

चिरागने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अमियाबद्दल माहिती देताना म्हटलं की, ‘सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही पहिल्यांदा भेटलो. मी मुंबईकर आहे तर ती दिल्लीकर. ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. ती आमच्या नेहमीच्या ट्रेनिंग सेशनचा हिस्सा असते. ती अनेकदा दिग्दर्शकांच्या टीमसोबतच असते. आम्हाला कोण कोणत्या मीटिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे याची ती आठवण करून देते. ती फार मनापासून काम शिकत आहे.’

सिनेमाचं पुढील चित्रीकरण धर्मशालामध्ये ठेवण्यात आलं आहे. यानंतर सिनेमाची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी स्कॉटलंड आणि लंडनला जाणार आहे. विष्णु इंदुरी यांनी सिनेमाची निर्मिती केली असून यात काही दाक्षिणात्य कलाकारही काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

First published: March 26, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या