मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेस सोडली- नारायण राणे

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेस सोडली- नारायण राणे

विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती मला पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाहीये. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा नारायण राणेंनी दिलाय. राणेंनी राजीनामा दिलेल्या जागेवर भाजपने त्यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना संधी दिल्याने, राणे भाजपवर संतापल्याचं बोललं जातं होतं.

  • Share this:

27 नोव्हेंबर, मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती मला पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाहीये. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा नारायण राणेंनी दिलाय. राणेंनी राजीनामा दिलेल्या जागेवर भाजपने त्यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना संधी दिल्याने, राणे भाजपवर संतापल्याचं बोललं जातं होतं. त्यावर नारायण राणेंनी हा खुलासा केलाय. यावरून काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राणेंची समजत काढल्याचं स्पष्ट होतंय, नारायण राणेंनीही ही बाब मान्य करत रात्रीच्या बैठकीत नेमकं काय झालं हे सांगितलं नसलं तरी माझं समाधान झाल्याचं स्पष्ट केलंय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेस सोडल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

नारायण राणे म्हणाले, '' काल रात्री मुख्यमंत्री आणि माझी बैठक वर्षावर झाली. त्यावेळी भाजपची भूमिका त्यांनी मला सांगितली आणि मला ती पटली त्यामुळे मी ही निवडणूक लढवत नाही. शिवसेनेमुळे मला उमेदवारी मिळाली नाही हे मी मानायला तयार नाही. मला उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. नारायण राणेंसाठी तीन पक्ष एकत्र येणार हाच माझा विजय आहे. नारायण राणेंसारखे शिवसेनेत कार्यकर्ते होते म्हणून आज शिवसेना टिकलीय. उध्दव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. जूनच्या आधीही काहीही होऊ शकतं. लवकरच कळेल. मी मुख्यमंत्री राहिलोय, मला आमदारकीचं काय?, माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे.''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 04:46 PM IST

ताज्या बातम्या