नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा 25 तारखेला फैसला

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा 25 तारखेला फैसला

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा फैसला आता 25 तारखेला होणार आहे. येत्या सोमवारी नवीदिल्लीत भाजपच्य राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आलीय. त्यात नारायण राणेंना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, यासंबंधीचा अंतिम फैसला पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा फैसला आता 25 तारखेला होणार आहे. येत्या सोमवारी नवीदिल्लीत भाजपच्य राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आलीय. त्यात नारायण राणेंना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, यासंबंधीचा अंतिम फैसला पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. या बैठकीनंतरच अमित शहा आणि मुख्यमंत्री यांच्यात बोलणी होऊन राणेंच्या भाजप प्रवेशासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचा एक गट राणेंना पक्षात घेण्यासाठी आग्रही आहे तर दुसरा गट तीव्र विरोध करतोय. पण कोकणात शिवसेनेला काटशह देण्यासाठी भाजपचे काही ज्येष्ठ राणेंना पक्षात घेण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे राणेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. पण राणे पक्षात आले तर त्यांना नेमकं काय पद द्यायचं तसंच राणे समर्थकांचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं, यावरच उभयतांमध्ये चर्चेचं घोडं अडल्यामुळेच भाजपकडून राणेंच्या पक्ष प्रवेशाला अधिकृतरित्या दुजोरा दिला जात नाहीये. पण तरीही मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जाण्याआधीच राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय नक्कीच घेतला जाईल, अशं भाजपच्या खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं जातंय.

First published: September 23, 2017, 9:28 AM IST

ताज्या बातम्या