ऋषी कपूरच्या आजाराचे सस्पेन्स कायम, कुटुंबातील ही व्यक्ती गेली भेटायला

ऋषी कपूरच्या आजाराचे सस्पेन्स कायम, कुटुंबातील ही व्यक्ती गेली भेटायला

मार्च महिन्याच्या अखेरीस ऋषी भारतात परततील असा म्हटले जात होते. मात्र असे काही होणार नसल्याचे लवकरच स्पष्ट झाले.

  • Share this:

मुंबई, १४ मार्च २०१९- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत त्यांच्या आजारावर उपचार घेत आहेत. अजूनपर्यंत त्यांना कोणता आजार झाला याबद्दल कपूर कुटुंबाकडून कोणताही खुलासा झालेला नाही. मार्च महिन्याच्या अखेरीस ऋषी भारतात परततील असा म्हटले जात होते. मात्र असे काही होणार नसल्याचे लवकरच स्पष्ट झाले.

आता अशी बातमी समोर आली आहे की, भावाला धीर देण्यासाठी रणधीर कपूर अमेरिकेला रवाना झाले आहेत. पिंकविलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ऋषी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं मनोबळ उंचावण्यासाठी रणधीर अमेरिकेत गेले आहे. तिथे ते साधारणपणे तीन आठवडे राहतील. ऋषी यांच्या देखभालीसाठी त्यांची पत्नी नीतू कपूरही आहेत.

ऋषी यांचा मुलगा रणबीर आणि मुलगी रिद्धीमाही अनेकदा अमेरिकेत जाऊन त्यांना भेटतात. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तर संपूर्ण कपूर कुटुंबासोबत आलिया भट्टही तिथे उपस्थित होती.

ऋषी कपूर यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार त्यांना भेटायला अमेरिकेत जात असतात. आतापर्यंत प्रियांका चोप्रा, अनुपम खेर, शाहरुख खान, आमिर खान हे कलाकार ऋषी यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. अनेक वेबसाइटवर ऋषी यांना कर्करोग झाल्याचे निदान केल्याबद्दल लिहिले गेले होते. मात्र रणधीर यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं.

ऋषी कपूर यांचे लेटेस्ट फोटो पाहिले तर त्यांचा लूक पूर्ण बदलल्याचं लक्षात येतं. नेहमीच उत्साही असणारे ऋषी या फोटोंमध्ये आधीपेक्षा जास्त अशक्त वाटत आहेत. असे असले तरी सोशल मीडियावर ते अजूही सक्रीय आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला पाठिंबा देणारं ट्वीट केलं होतं.

VIDEO: कोकणातला होलीकोत्सव पाहिला का?

First published: March 14, 2019, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading