आपल्या एका हट्टापायी तब्बल १९ वर्ष पत्नीपासून दूर राहिला 'हा' अभिनेता

मुलींच्या करिअरच्या वादामुळे बबीता आणि रणधीर १९ वर्ष एकमेकांपासून दूर राहिले होते.

  • Share this:

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि कपूर कुटुंबातील महत्त्वपूर्ण व्यक्ती रणधीर कपूर आज १५ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. रणधीर यांनी ‘श्री ४२०’ सिनेमातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. असं असतानाही करिश्मा कपूर आणि करिना कपूर या त्यांच्या मुलींनी सिनेमात कधीही काम करू नये असं त्यांचं स्पष्ट मत होतं.

रणधीरच्या या विचारांमुळेच त्यांच्या खासगी आयुष्यात फार मोठं वादळ आलं होतं. वाद एवढ्या टोकाला गेले होते की रणधीर यांच्या पत्नी बबीता यांनी घर सोडलं होतं.

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा रणधीर यांच्या करिअरला उतरती कळा लागली होती आणि करिश्माला सिनेसृष्टीत प्रवेश करायचा होता. मात्र एका ‘फिल्मी’ बापाप्रमाणे करिश्माने कधीही सिनेसृष्टीत काम करू नये असं रणधीर यांना वाटत होतं.

रणधीर यांच्याहून वेगळी मतं बबीता यांची होती. स्वतःप्रमाणे करिश्माही एक अभिनेत्री व्हावी असं बबीता यांना वाटत होतं. ‘लोलो’च्या बॉलिवूड करिअरवरून बबीता आणि रणधीर यांच्यात अनेक वाद झाले. अखेर १९८८ मध्ये बबीता यांनी घर सोडलं.

एकीकडे बबीता यांनी घर सोडलं असलं तरी मुलीला सिनेमांत काम करण्यापासून ते रोखू शकले नाही. करिश्माने १९९१ मध्ये प्रेम कैदी सिनेमातून सिनेकरिअरला सुरुवात केली. तोपर्यंत बबीता यांनी रणधीर यांना घटस्फोट दिला नव्हता आणि घरीही परतल्या नव्हत्या.

करिश्माच्या करिअरच्या नऊ वर्षांनंतर २००० मध्ये करिनानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दोन्ही मुली बॉलिवूडमध्ये सेटल झाल्यानंतर २००७ मध्ये बबीता आणि रणधीर एकत्र आले. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की मुलींच्या करिअरच्या वादामुळे बबीता आणि रणधीर १९ वर्ष एकमेकांपासून दूर राहिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2019 10:23 AM IST

ताज्या बातम्या