मोदी सरकारच्या 'या' नेत्याने जैशच्या म्होरक्याला दिला मानपान, म्हणाले....

मोदी सरकारच्या 'या' नेत्याने जैशच्या म्होरक्याला दिला मानपान, म्हणाले....

जयंत सिन्हा यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरला जी म्हणून संबोधित केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्व स्तरातून सिन्हांवर टीका होत आहे.

  • Share this:

झारखंड, 04 मे : झारखंडच्या रामगड जिल्ह्यामध्ये एक रोड शो दरम्यान केंद्रिय उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची जीभ घसरली. जयंत सिन्हा यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरला जी म्हणून संबोधित केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्व स्तरातून सिन्हांवर टीका होत आहे.

झारखंडमध्ये 6 मे रोजी 4 जागांवर निवडणुका होणार आहे. ज्यामध्ये हजारीबाग लोकसभा मतदार संघातून जयंत सिन्हा हे भाजपचे उमेदवार आहेत. आता निवडणुका म्हटलं की प्रचार आलाच. त्यात नेत्यांकडून भाषणात होणाऱ्या चुका म्हणजे सगळ्यात गाजणार विशष आहे. अशीच गंभीर चुक जयंत सिन्हा यांनी केली आहे.

हेही वाचा : VIDEO : राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले

खरंतर याआधी जीतन राम मांझी यांनीदेखील मसूद अजहरला साहेब म्हणत संबोधित केलं होतं. ज्यावर भाजपने त्यांच्यावर अनेक टीका केल्या होत्या. अशाच टीकांचा सामना काँग्रेसचे नेता दिग्विजय सिंह यांनीही करावा लागला होता. त्यांनी हाफिज सईदला जी म्हणत संबोधलं होतं.

गेल्या काही दिवसांआधी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं. पुलवामा आणि पठानकोटच्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरवर प्रतिबंध घालणं हा मोदी सरकार मोठा विजय मानला जातो.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ठीक 75 दिवसांत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित करण्यात आलं. पण त्यात भाषणावेळी जयंत सिन्हा यांनी अजहरला जी म्हणून संबोधलं. त्यामुळे भाजपवर सध्या विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

VIDEO : किळसवाणा प्रकार, पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये जेवणात आढळले रक्ताने माखलेले बोळे!

First published: May 4, 2019, 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading