Home /News /news /

क्रिकेटनंतर धोनी आता शेतीत आजमावतोय नशीब; 40 रुपये किलोनी विकले टोमॅटो

क्रिकेटनंतर धोनी आता शेतीत आजमावतोय नशीब; 40 रुपये किलोनी विकले टोमॅटो

रांचीच्या बाजारपेठेत धोनीच्या (MS DHONI) शेतातल्या भाज्या भरपूर विकल्या जात आहेत. सगळ्यात जास्त चर्चा आहे माहीच्या शेतातल्या टोमॅटोंची.

    रांची, 26 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M H Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असेल, पण त्याच्या नावाचा दरारा अजूनही आहे. क्रिकेटनंतर धोनी आता शेतीत आपला हात आजमावत आहे. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या बाजारात धोनीच्या शेतातल्या भाज्या भरपूर विकल्या जात आहेत. या भाज्यांची चर्चा आता रांचीमधून निघून इतर राज्यांतही होत आहे. भाजीपाला बाजारात ज्या भाजीची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे धोनीच्या शेतातील टोमॅटो. धोनीने आपल्या 43 एकराच्या फार्म हाऊसमध्ये 3 एकरांत फक्त टोमॅटोची लागवड केली आहे. शेतातल्या झाडांवर टोमॅटो पिकल्यानंतर ते धोनीच्या फार्म हाऊसमधून बाजारात पाठवले जात आहेत. TO 1156 प्रकाराचे हे टोमॅटो बाजारात 40 रुपये प्रति किलोला विकले जात आहे. रांचीच्या सँबो येथे धोनीचे फार्म हाऊस आहे. टोमॅटोबरोबरच इतर भाजीपालाही येथे पिकविला जात आहे. टोमॅटो बाजारात दाखल सुद्धा झाला आहेत. जाणकारांचं म्हणणं आहे की, धोनीच्या फार्म हाऊसमधले टोमॅटो खास असतात. मार्केटमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. धोनीची अशी इच्छा आहे की त्याच्याबरोबर शेतातील कामांसाठी असलेली संपूर्ण टीमच्या उत्पन्नाचे साधन हे त्याच्या फार्म हाऊसमधून विकल्या जाणाऱ्या भाजीपाला असाव्यात. टोमॅटो सोबतच धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी आणि मटारची लागवड केली आहे. खरं तर धोनीला मटार खूप आवडतो. धोनीचे अग्रीकल्चर कंसल्टंट रोशन कुमार सांगतात की, धोनी म्हणाला आहे की, जेव्हा तो फार्म हाऊसवर येईन तेव्हा इथले मटार शेतातच तोडून तिथेच बसून स्वतः खाणार आहे. या वर्षी झाला निवृत्त महेंद्रसिंग धोनीने या वर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो IPL मध्ये या वेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता, पण आयपीएलमधील त्याची कामगिरी काही खास नव्हती. यामुळे तो टीकाकारांच्या रडारवर आला आहे.
    First published:

    Tags: MS Dhoni

    पुढील बातम्या