मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रणबीर-आलियाने केलं Kiss; कपलचा रोमँटिक Photo काहीच क्षणांत Viral

रणबीर-आलियाने केलं Kiss; कपलचा रोमँटिक Photo काहीच क्षणांत Viral

Ranbir Kapoor and Alia Bhatt

Ranbir Kapoor and Alia Bhatt

आलियाचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे. ज्यात रणबीर आणि आलिया देखील दिसत आहेत.

  • Published by:  News Digital

मुंबई 20 ऑगस्ट : बॉलिवूड मधील सर्वात चर्चेत राहणार कपल म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor). रणबीर आणि आलिया ने आपली रिलेशनशिप ही आता जगजाहीर केली आहे. अनेकदा ते ट्रिप वर एकत्र जाताना दिसतात. तर आता अनेकदा आलिया रणबीर साठी सोशल मीडियावर stories देखील पोस्ट करत असते. पण सध्या आलिया आणि रणबीरचा एक फोटो फारच व्हायरल होत आहे.

आलियाचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे. मात्र त्या मागे काही फोटो फ्रेम्स लावल्या आहेत. ज्यात रणबीर आणि आलिया देखील दिसत आहेत.  दरम्यान ही एक ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम आहे. तर रणबीर आणि आलिया रोमँटिक मूड मध्ये दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Lakshmi Lehr (@lakshmilehr)

दरम्यान हे फोटोज रणथंबोर गार्डन मधील दिसत आहेत. जिथे संपूर्ण कुटुंब नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गेलं होतं. सोनी राजदान, शाहीन भट्ट, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर देखील यावेळी त्यांच्या सोबत गेले होते. रणबीर आलियाचा हा किसींग (Ranbir - Alia kissing photo) फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रम्हस्त्र’ (Bramhastra) या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मागील 3 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसतात. तर भट्ट आणि कपूर कुटुंब ही एकत्र कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात.

नुकतीच आलियाने तिचा आगामी चित्रपट ‘रिंकी ओर राणी की प्रेमकहाणीची’ (Rinky or Rani ki premkahani) शूटिंग सुरू केली आहे. ज्यात ती अभिनेत्री रणवीर सिंग सोबत दिसणार आहे. तर लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठीयावाडी’ (Gangubai Kathiawadi)  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor