सोशल मीडियावर आपल्या या एक्स गर्लफ्रेंडला फॉलो करतो रणबीर कपूर

सोशल मीडियावर आपल्या या एक्स गर्लफ्रेंडला फॉलो करतो रणबीर कपूर

रणबीरचं स्वतःचं सीक्रेट अकाउंट आहे, जिथून त्याला कोणाचं काय सुरू आहे याबद्दल सर्व गोष्टी माहीत असतात.

  • Share this:

मुंबई, २६ मे- रणबीर कपूरचं सोशल मीडियावर कोणतंच अधिकृत अकाउंट नाही. पण, तो दुसऱ्या नावाने सोशल मीडियावर असल्याचं त्याने मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने खुलासा केला की, फार कमी लोकांना तो सोशल मीडियावर फॉलो करतो. या सीक्रेट अकाउंटवरून तो एक्स गर्लफ्रेंड दीपिका आणि कतरिना कैफला अजूनही फॉलो करतो. या दोघींशिवाय तो आलियालाही फॉलो करतो.

 

View this post on Instagram

 

सारी की सारी हिंदुस्तानी नारी 🌻 💎 @kalyanjewellers_official

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

तसेच एका मुलाखतीत कतरिनाने सांगितलं होतं की, इन्स्टाग्राम कसं वापरायचं हे रणबीरनेच तिला शिकवलं होतं. रणबीरचं स्वतःचं सीक्रेट अकाउंट आहे, जिथून त्याला कोणाचं काय सुरू आहे याबद्दल सर्व गोष्टी माहीत असतात. रणबीर आणि कतरिनाने तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. 2016 मध्ये दोघांनी ब्रेकअप केलं. दोघांचं ब्रेकअप नेमकी कशावरून झालं याबद्दल कोणीही सांगितलं नाही. सध्या रणबीर आलियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण आलियाने मात्र यात काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

रणबीर कपूर सध्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पहिल्यांदा आलिया भट्ट काम करणार आहे. या दोघांशिवाय अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे.

मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित

First published: May 26, 2019, 4:24 PM IST

ताज्या बातम्या