आलियाच्या मदतीला रणबीरची हॉस्पिटलमध्ये धाव; आलिया भट्टला नेमकं झालं काय?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबईत हॉस्पिटलच्या बाहेर एकत्र दिसले. आलियाला घेऊन रणबीर हॉस्पिटलमध्ये धावला. आलिया सुखरूप दिसतेय. पण तिच्या या त्रस्त चेहऱ्यामागचं काय आहे कारण?

  • Share this:

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये स्टार वेडिंगची लगबग सुरू आहे, तरी आता या दोघांच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते पाहत आहेत. न्यूयॉर्कमध्ये ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते त्यानंतर आता मुंबईत एका क्लिनिकच्या बाहेर ते एकत्र दिसले आहेत.

आलिया आणि रणबीर एकत्र शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. शूटिंगच्या दरम्यान आलियाला दुखापत झाली. हे रणबीरला कळताच त्याने आलियाला घेवून हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

दोघेही कलाकार अभिनयात उत्कृष्ट आहेतच. त्याचबरोबर ते आपल्या कामाला गंभीरपणे घेतात. सध्या ते दोघं एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे.

आलिया आणि रणबीर लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे. फोटोमध्ये रणबीर कपूर आलियाची काळजी घेताना देखील दिसून येत आहे.

शूटिंग दरम्यान किरकोळ दुखापत झाल्यानं आलिया चिंताग्रस्त दिसत आहे. औषध-उपचार करून हॉस्पिटलमधून बाहेर पडताना रणवीर आलिया कॅमेऱ्यात कैद झाले. याआधी ते दोघे रात्रीच्या वेळी मुंबईत एकत्र दिसले होते

बाॅलिवूडचे लव्ह बर्डस् म्हणून आता प्रसिद्ध झालेत. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा जोरात सुरू आहेत.

नुकतंच दोघांना एका डान्स क्लासमधून बाहेर पडताना एकत्र पाहिलं.

दोघं एकदम थकलेले दिसत होते. सध्या ब्रम्हास्त्र सिनेमासाठी दोघं डान्सची रिहर्सल जोरात करतात.

रणबीर नुकताच अमेरिकेहून परतलाय. तिथे ऋषी कपूरवर उपचार सुरू आहेत.

मध्यंतरी आता रणबीरनं आणखी एक फोटो शेअर केलाय. त्यात आलिया कुटुंबातली एक असल्यासारखी वाटते. सोबत नितू कपूर आणि ऋषी कपूरही आहेत. त्यामुळे आता पुढच्या वर्षी कपूर आणि भट्ट कुटुंबात लग्नाचे चौघडे वाजणार असं दिसतंय.

काही दिवसांपूर्वी रणबीरनं लग्न कधी करायचं यावरही गंभीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, ' जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, एकमेकांबरोबर आयुष्य घालवावं असं वाटतं तेव्हा लग्न करायचं. माझ्या आयुष्यात तरी अजून कुणी नाहीय. मी 35 वर्षांचा झालो, म्हणून आता लग्न करायला हवं, असं अजिबातच नाहीय. ते सहज व्हायला हवं.'

ब्रम्हास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 01:51 PM IST

ताज्या बातम्या