13 जून : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळा प्रकरणातला आरोपी आमदार रमेश कदम थेट मंत्रालयात पोहचला. अटकेत असलेल्या रमेश कदमला सेशन्स कोर्टाने परवानगी दिल्यानं त्यानं गृहसचिवांना भेटण्यासाठी आला होता.
काही दिवसांपूर्वी पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळे रमेश कदम अडचणीत सापडला होता. त्यामुळे आज गृह विभागाचे सहसचिव ज.ल.पावरा यांची भेट घेतली. त्यानं सहसचिवांना भेटल्यावर जेल प्रशासनातील पोलिसांची वागणूक आणि पोलिसांच्या मदतीनं चालणारे गैरप्रकार याबाबत त्यानं तक्रारही केली. .
तसंच आपण पोलीस खात्याचा आदर करतो, जी काही शिवीगाळ झाली ती त्या पोलीस अधिकाऱ्याने पैशांची मागणी केल्यामुळे झाली तसंच त्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल होईल असा दावा रमेश कदम यांने केलाय.