रामदास कदमांच्या स्वीय सचिवाने वायुसेनेचं लढाऊ विमान 'पळवले'

रामदास कदमांच्या स्वीय सचिवाने वायुसेनेचं लढाऊ विमान 'पळवले'

वायुसेनेच्या दलातील T.T.L-H.P.T 32 हे लढाऊ विमान मंजूर करून ते ८जूनला खेडकडे रवाना झाले होते.

  • Share this:

शिवाजी गोरे, रत्नागिरी, 16 जून : खेड नगरपरिषदेला भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आलेले विमान चोरीला गेल्याची घटना समोर आलीये. धक्कादायक म्हणजे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या स्वीय सचिवाने विमान परस्पर दुसरीकडे नेल्यामुळे हा प्रकार समोर आला.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात खेड मधील सैनिकांनाही बजावलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा सन्मान करण्यासाठी संरक्षक विभागाने शिवथर येथील माजी सैनिकांच्या संघटनेला एक विमान स्मारक स्वरूपात उभारण्यासाठी दिले. मात्र त्याची देखभाल शक्य नसल्याने या माजी सैनिकांनी खेड नगर पालिकेच्या ताब्यात शहरात  बसवण्याची परवानगी पालिकेला  दिली.

...तर सातारा नाव दिसलं नसतं, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा अहेर

२०१५ पासून पालिकेने संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करत अखेर मे २०१८ ला हे विमान खेड नगर पालिकेकरिता मंजूर होऊन रवाना झाले. संरक्षण विभागाने पाठवलेले विमान आपल्यापर्यंत पोहोचले का याची चौकशी संरक्षण विभागाने खेड नगर पालिकेला केली आणि विमान पोहोचले असल्यास तशी पोच देण्याचे कळवले. तेव्हा हे विमान गेलं कुठे याचा शोध सुरू झाला.

गाड्या सोडून द्या, महसूलमंत्र्यांच्या दालनातून वाळू माफियाचा फोन !

तेव्हा नगर पालिकेला हे विमान खेडमध्ये आले पण आपल्यापर्यंत पोहोचले नाही हे लक्षात आले. या संपूर्ण चोरी प्रकरणात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या स्वीय सहाय्यक योगेश सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी नगराध्यक्ष यांच्याकडून करण्यात आली आहे.

फ्रिजमध्ये नका ठेवू 'हे' 12 पदार्थ !

काय आहे प्रकरण

वायुसेनेच्या दलातील T.T.L-H.P.T 32 हे लढाऊ विमान मंजूर करून ते ८जूनला खेडकडे रवाना झाले होते. सदर विमान खेडला आल्यावर रातोरात खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या कागदपत्रांची खोट्या झेराॅक्स दाखवून मंत्री रामदास कदम यांचा सचिव योगेशने ते परस्पर योगिता दंत महाविद्यालय येथे गुपचूप नेऊन ठेवले आहे असा आरोप होत आहे.

शानदार,जबरदस्त, झिंदाबाद..!,मनमाडच्या 'मांझी'ने एकट्याने बांधला बंधारा

दरम्यान, खेड नगरपंचायतीकडे असलेल्या विमानाला चुकीच्या जागा दाखवून ते रामदास कदम यांच्या डेंटल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलंय. त्यामुळे शिवतर येथील शहीद जवान आणि खेडमधील जनतेचा अपमान असल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलाय.

तक्रार दाखल

खेड नगरपरिषदेला भारतीय सैन्य दलाकडून आलेले विमान चोरीला गेल्याची नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली. रामदास कदम यांच्या स्वीय सचिवावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 11:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading