कर्जमाफीसाठी मंत्रिगट हा निव्वळ वेळ काढूपणा -रामदास कदम

कर्जमाफीसाठी मंत्रिगट हा निव्वळ वेळ काढूपणा -रामदास कदम

यूपीमध्ये कर्जमुक्ती झाली तिथे काही समिती गठन केली नाही. समिती गठीत करण्याची आवश्यकता नव्हती.

  • Share this:

10 जून : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मंत्रिगटाची गरजच काय ?,   फक्त वेळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलीये. ते हिंगोलीत बोलत होते.

यूपीमध्ये कर्जमुक्ती झाली तिथे काही समिती गठन केली नाही. समिती गठीत करण्याची आवश्यकता नव्हती. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दोन महिन्यात कर्जमुक्ती देऊ असं आश्वासन दिलं होतं. गेल्या तीन चार महिन्यापासून तुम्ही आश्वासनं देत आहेत. समिती गठन करण्यासाठी चार महिने लागतात का ?, फक्त वेळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही कदमांनी केला.

मंत्रिगट नेमायचाच होता तर शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रातून दिल्लीला चर्चेसाठी नेलंच कशाला असा सवालही कदम यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 10:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading