रत्नागिरी, 11 मार्च : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाईमागे शिवसेना नेते रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास कदम समोरून अंगावर जातो. पाठीमागून खंजीर खुपसण्याचे काम करत नाही. सदानंद कदम यांच्या कारवाईमध्ये माझा हातच काय? तर डोकं किंवा पाय देखील नाही, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे.
तर सर्वात आधी अनिल परब यांना आत टाकलं असतं : रामदास कदम
सदानंद कदम यांच्या अटकेमागे रामदास कदम यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. यावर रामदास कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सदानंद कदम यांच्यावर झालेल्या कारवाईत माझा काहीही हात नाही. मी समोरून अंगावर जातो. पाठीमागून खंजीर खुपसण्याचे काम करत नाही. ईडीने माझं ऐकलं असतं तर सर्वात आधी अनिल परब यांना आत टाकल असतं, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे. सदानंद कदम यांना अनिल परब यांनी फसवले असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. सदानंद कदम आणि अनिल परब केबल व्यवसायात पार्टनर आहेत, त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी रामदास कदम यांनी केली आहे.
वाचा - ajit pawar interview :...म्हणून त्या दिवशी डोळा मारला, अखेर अजितदादांनी केला खुलासा
सदानंद कदम यांना अटक
दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे व संशयास्पद खरेदी-विक्रीचे प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विद्यमान आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचेही नाव आले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, Ramdas kadam