राज ठाकरे यांच्यानंतर रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे Wine Shop बाबत केली ही मागणी

राज ठाकरे यांच्यानंतर रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे Wine Shop बाबत केली ही मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाईन शॉप सुरू करावे, अशी मागणी केली आहे. मात्र आता त्याला विरोध होत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाईन शॉप सुरू करावे, असं पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात दारूची दुकाने उघडली जावू नयेत, अशी मागणी केली आहे. राज्यात दारुची दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागातील महिला खूश आहेत. दारुची दुकाने बंद असल्यामुळे व्यसनाचं प्रमाण कमी झालं आहे. गावागावातील खूश आहे पारू लॉकडॉऊनमुळे नवऱ्याची सुटली दारू, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा.. सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, फटाक्याच्या धुरातून रुग्णाला चालतच आणलं घरी

रामदास आठवले म्हणाले की, कोरोनाला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे. थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेणे म्हणजे कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकाने सुरु न करण्यासंदर्भात रामदास आठवले हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यातील महसूलासाठी वाईन शॉप सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यासोबतच त्यांनी पत्रामध्ये त्यांनी वाईन शॉप्ससोबतच हॉटेल, खानावळी देखील सुरू करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन आहे. यामुळे राज्यातील उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका राज्य सरकारला बसला आहे.

हेही वाचा.. धक्कादायक! परळीत क्षुल्लक कारणावरुन उपसली तलवार, एकाचं नाक कापलं

या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत राज्याला महसूल मिळवून देणारे वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल, हे बघायला काय हरकत आहे? असे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्रही लिहिले होते.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 26, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या