Home /News /news /

कोरेगाव भीमा प्रकरणी रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

कोरेगाव भीमा प्रकरणी रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ आज रामदास आठवले यांनीही कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेऊन यासंबंधीचं निवेदन दिलं.

पुढे वाचा ...
06 जानेवारी, मुंबई : प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ आज रामदास आठवले यांनीही कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेऊन यासंबंधीचं निवेदन दिलं. या भेटीनंतर रामदास आठवलेंनी पत्रकार परिषदही घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी जिग्नेश मेवाणी यांना जबाबदार धरता येणार नाही, असंही रामदास आठवलेंनी म्हटलंय तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण करायलाही ते विसरले नाहीत. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान अजूनही गप्प का आहेत असं विचारलं असता प्रत्येक विषयावर पंतप्रधानांनी मत देण्याची गरजच काय, असा आश्चर्यकारक पवित्रा आठवलेंनी घेतल्याने सगळेच बुचकाळ्यात पडलेत. खरंतर राज्यात मास बेस असलेल्या निवडक दलित नेत्यांपैकी आठवले हे महत्वाचे नेते आहेत. पण आठवले अशा संभ्रमावस्थेत असण्याचं एकच कारण हे की त्यांच्या पाठिंब्याशिवाय प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखवला. त्यामुळे आठवलेंची अडचण दुहेरी झालीय. एकिकडे समाजाची बाजू घेतली तर मंत्रिपद जाण्याची भीती, आणि पूर्णपणे सरकारची बाजू घेतली तर समाज नाराज होण्याचा धोका आठवलेंना संभवतोय. कदाचित त्यामुळेच आठवलेंनी एकाचवेळी परस्परविरोधी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.
First published:

Tags: Cm fadanvis, Ramdas athawale, कोरेगाव भीमा, जिग्नेश मेवाणी, पीएम मोदी, मुख्मंत्री, रामदास आठवले

पुढील बातम्या