Home /News /news /

कोरेगाव भीमातील हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात !- रामदास आठवले

कोरेगाव भीमातील हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात !- रामदास आठवले

जानेवारीला कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात असण्याची शक्यता केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलाय. न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात ते बोलत होते. कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमत्री रामदास आठवले यांची बेधडक मुलाखत घेतलीय.

पुढे वाचा ...
06 जानेवारी, मुंबई : जानेवारीला कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात असण्याची शक्यता केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलाय. न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात ते बोलत होते. कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमत्री रामदास आठवले यांची बेधडक मुलाखत घेतलीय. या कार्यक्रमात आठवलेंनी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचारामागे मराठा संघटनांचा हात असल्याची शंका उपस्थित केलीय. तसंच जर समजा या दंगलीमागे संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशीही भूमिका मांडलीय. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्याचं सांगितलं. भाजपच्या राज्यात दलितांवर अत्याचार होत नसल्याचा दावा करत 2019 सालच्या निवडणुकीतही आपण मोदींसोबतच राहू, अशीही माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चांगलं काम करत असल्याचं सर्टिफिकेट आठवलेंनी यावेळी देऊन टाकलं. यासोबतच जिग्नेश मेवाणी हे फक्त गुजरातचे दलित नेते असून त्यांच्यापासून आपल्याला कोणताही राजकीय धोका वाटत नाही, असंही आठवलेंनी यावेळी स्पष्ट केलंय. रामदास आठवलेंची संपूर्ण मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता....
First published:

Tags: Bedhadak, Koregoan bhima, Ramdas athwale, Riots, आठवलेंचा आरोप, दंगल, भीमा कोरेगाव, मराठा संघटनांचा हात

पुढील बातम्या