ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना सरकारचा पाठिंबा

ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना सरकारचा पाठिंबा

गल्फमध्ये उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांना त्यांच्या अडचणीत भारत सरकार मदत करेल, येथील मराठी आणि सर्व भारतीय उद्योजकांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीर उभे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,24 फेब्रुवारी:भारतात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

दुबई येथील हॉटेल एटलांटिसमध्ये गल्फ महाराष्ट्र बिझनेस फॉरमच्या वतीने 'महाबीज 2020' या उद्योजकांच्या भव्य परिषदेचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात रामदास आठवले यांनी भारतात उद्योगधंद्याच्या वाढीसाठी केंद्र सरकार उद्योजकांना पाठिंबा देत असल्याचे आठवलेंनी सांगितले.

CAA आंदोलन : राजधानी पुन्हा पेटली; आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू, 20 जखमी

संयुक्त अरब अमिरातीत संपूर्ण आखाती राष्ट्रात स्थायिक झालेले मराठी भाषिक उद्योजक आणि महाराष्ट्रातील 200 हून अधिक असे एकूण 500 उद्योजक या परिषदेला उपस्थित होते. तसेच दुबईतील प्रसिद्ध शराफ ग्रुपचे उपाध्यक्ष उद्योगपती मेजर शरफूद्दीन शराफ, गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर, राहुल तुळपुळे आदी उपस्थित होते.

भारतीय नवउद्योजकांना त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. मागासवर्गीय उद्योजकांच्या उद्योगवाढीसाठी व्हेंचर कॅपिटलसारख्या योजना सुरू असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. दुबई आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीत महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी येथे यशस्वी उद्योग उभारणी केल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत सर्व गल्फमधील मराठी उद्योजकांचे कौतुक केले. गल्फमध्ये उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांना त्यांच्या अडचणीत भारत सरकार मदत करेल, येथील मराठी आणि सर्व भारतीय उद्योजकांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीर उभे असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

62 वर्षीय वॉचमनचा मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर झाल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2020 09:29 PM IST

ताज्या बातम्या