मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भाजपकडून विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी तयारी, राम शिंदेंचं नाव आघाडीवर!

भाजपकडून विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी तयारी, राम शिंदेंचं नाव आघाडीवर!

सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 16 ऑगस्ट : शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक मलाईदार खाते भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. आता भाजपने विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा रंगली आहे. तसंच, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही नव्याने सादर केली जाणार आहे. उद्या बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शिंदे सरकारचे हे पहिले पावसाळी अधिवेशन आहे. आता विधान परिषदेचा सभापती बसवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे 11 आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 10 जागा आहेत. तसंच 16 जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल. (ट्रक थेट घरात घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नीवर झोपेतच काळाचा घाला) दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमी खाती देण्यात आली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. या खातेवाटपानंतर शिंदे गटामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. इतर 18 मंत्र्यांची खाती 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
First published:

पुढील बातम्या