राम शिंदे हे बॅनर मंत्री, रोहित पवारांची झणझणीत टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने जामखेड बाजारतळावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांनी ही टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 02:39 PM IST

राम शिंदे हे बॅनर मंत्री, रोहित पवारांची झणझणीत टीका

अहमदनगर, 27 ऑगस्ट : गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत आहेत. पण केलेली कामं नागरिकांना दिसत नाहीत. गावात विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली असल्याने जमखेडचे लोकप्रतिनिधी हे बॅनर मंत्री असल्याची तिखट टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने जामखेड बाजारतळावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांनी ही टीका केली आहे. रोहित पवार हेच आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे. याची स्पृष्टी सभेस उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. रोहित पवार हेच कर्जत-जमखेडचे पुढचे आमदार असतील असे जाहीर वक्तव्य त्यांनी केलं आहे.

सभेत खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान आदी उपस्थित होते. याच मतदारसंघातून उमेदवारी मागत असलेल्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड मात्र सभेस अनुपस्थित होत्या. जामखेडमधे एकाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनांदेश यात्रा आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आलेल्या असताना या सभांना मोठ्या गर्दीची तजवीज दोन्ही बाजूंनी केल्याचं दिसून आलं.

अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांचे प्रयत्न? राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राहणार अनुपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदारपूरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहणार आहेत. शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणात अटकपूर्ण जामीन मिळावा, यासाठी अजित पवार हे सध्या मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अजित पवार यांनी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज अनुपस्थित राहणार आहेत.

Loading...

इतर बातम्या - भरधाव ट्रकची दोन टेम्पोंना भीषण धडक, 15 जणांचा मृत्यू

बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

पक्षाला गळती लागल्याने धक्के बसत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक हादरा बसलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 31 बँक संचालकांविरुद्ध पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने काही दिवसांपूर्वीच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर आज गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने कर्जवाटप केलं, असा आरोप आहे.

इतर बातम्या - खळबळजनक! मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कंत्राटदारांनी लुटले 100 कोटी

अजित पवारांचं काय आहे स्पष्टीकरण?

कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर अजित पवार यांनी या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. 'कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंदा नाही हे जाहीर भाषणात सांगतो,' असं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

Mission Paani: 'भारतासाठी Mission Paani जलआंदोलन' अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...